TB patients | उद्योगनगरीत क्षयरुग्णांचा चढता आलेख

आठ महिन्यांत या रोगाचे दोन हजार १८० रुग्ण आवश्यक औषधांचा ३ महिने पुरेल इतका साठा
TB patients
TB patientsFile Photo
Published on
Updated on

पुढारी प्रतिनिधी पिंपरी पुढारी

दीपेश सुराणा

पिंपरी-चिंचवड शहरातील क्षयरुग्णांच्या संख्येचा आलेख हा गेल्या काही वर्षांपासून चढता राहिला आहे. गेल्या आठ महिन्यांत या रोगाचे तब्बल दोन हजार १८० रुग्ण आढळून आले आहेत. (Tuberculosis patients)

उपचारांसाठी आवश्यक औषधांचा ३ महिने पुरेल इतका साठा आहे. उद्योगनगरीतील क्षयरुग्णांचा गेल्या साडेचार वर्षांचा आढावा घेतला असता, त्याचा आलेख चढता असल्याचे निदर्शनास आले आहे.

२०२० या वर्षात शहरात दोन हजार ६७ क्षयरुग्णांची नोंद झाली होती. तर, गतवर्षी म्हणजे २०२३ मध्ये २ हजार ९४८ इतके क्षयरुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी ते ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत २ हजार १८० रुग्ण आढळून आले आहेत.

पुरेशी औषधे उपलब्ध

एप्रिलमध्ये क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, मे महिन्यापासून पुरवठा सुरळीत सुरू झाला. सध्या तीन महिने पुरेल इतका साठा उपलब्ध असल्याची माहिती शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर यांनी दिली.

क्षयरोगाचे लवकर निदान झाल्यास रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करता येतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असणार्या व्यक्तींना या आजाराची लागण होण्याची शक्यता जास्त असते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकस आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

डॉ. बाळासाहेब होडगर, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news