

पिंपरी: सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. दहा दिवस चालणार्या या उत्सवामुळे फुलांना मागणी वाढली आहे. दररोज पुजेसाठी लागणार्या फुलांचा भाव वाढला आहे. होलसेलमध्ये 100 रुपये किलो मिळणारी फुले ही किरकोळ बाजारात 200 - 300 रुपये किलोने विकली जात आहेत.
शहरामध्ये घराघरांमध्ये, कार्यालयांमध्ये, छोट्यापासून मोठ्या मंडळामध्ये देखील गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे लागणारी फुलांची गरज वाढली आहे. तसेच फुलांच्या रांगोळ्या, सजावट यामुळे फुलांच्या खरेदीत दररोज वाढ होत आहे. फुलांचे हार आणि गजरे, सोनचाफा यांची मागणी वाढली आहे. (Latest Pimpri News)
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पिंपरी फूल बाजारात 50 ते 60 टन फुलांची आवक झाली होती. गणेशोत्सवाचे दिवस असल्याने दररोज 30 ते 40 टन फुलांची आवक होत आहे. यामध्ये केशरी व पिवळा झेंडू, शेवंती, गुलाब, अॅस्टर, ऑर्किड, कमळ, गुलछडी, जरबेरा आदी फुलांची आवक होत आहे.
सुट्टा गुलाब 400 रुपये किलो, डच गुलाब 1 हजार ते 1200 रुपये, ऑर्किड 600 रुपये किलो, जरबेरा 80 रुपयेे किलो.