पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून उकाड्यात वाढ होत आहे. दुपारी उन्हात बाहेर पडणाऱ्यांना उन्हाचा त्रास जाणवत आहे. गेली दोन दिवसांपासून शहरामध्ये ३२ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यामुळे दुपारी उन्हाळ्यासारखे उन्हाचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे ऑक्टोबर हिटसारखा अनुभव येत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढू लागला आहे. भर दुपारी उन्हात अंगाची काहिली होऊ लागली आहे.
पावसाळ्यात असणाऱ्या २३ ते २५ अंश तापमानानंतर ३० अंशांपुढे पुढे गेलेल्या तापमानामुळे नागरिकांना बेचैनी निर्माण होत आहे. पुढील चार ते पाच दिवस तापमान ३० ते ३२ अंशादरम्यान राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. ऋतुबदलामुळे आजारी पडणाऱ्यांची संख्याही वाढल्याचे त्यांनी सांगितले.