

पुणे: गुंतवणुकीच्या बहाण्याने 37 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरंजन शहा (रा. नांदेड सिटी), निसर्ग शहा व मेघना शहा (दोघेही प्राइड ग््रुापचे मेंबर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. (Latest Pune News)
याबाबत राजेंद्र आनंदराव पाटील (वय 50, रा. स्वप्नपूर्ती अपार्टमेंट, पिंपरी गाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राजेंद्र पाटील यांनी 26 लाख रुपये गुंतवणूक केली. आरोपींनी सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक केलेल्या रकमेवर ठरल्याप्रमाणे सात लाख मुद्दल व परतावा दिला. परंतु, ऑक्टोबर 2023 पासून त्यांनी तक्रारदाराला मुद्दल व नफा काहीच दिलेला नाही. पाटील यांनी वारंवार पैशाची मागणी करूनही त्यांना पैसे दिले नाहीत.