Fire News : खासगी आराम बसला आग; सात प्रवासी थोडक्यात बचावले

आग इतकी भीषण होती की बस जळून खाक
burning bus
आराम बसला आगPudhari
Published on
Updated on

जगताप डेअरी येथे एका खासगी आराम बसला आग लागली. ही घटना रविवारी (दि. 5) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली. सुदैवाने बसमधील सातही प्रवाशांना वेळेत खाली उतरवण्यात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आग इतकी भीषण होती की बस जळून खाक झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीकडे जाणारी बस नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन जात असताना, जगताप डेअरीजवळ बसच्या मागील भागातून अचानक धूर येऊ लागला. चालकाच्या लक्षात येताच त्याने तातडीने बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि प्रवाशांंना खाली उतरवण्यासाठी सूचना दिल्या. धूर दिसताच प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.

शॉर्टसर्किटमुळे आग?

बसमधील काही प्रवाशांच्या मते, बसच्या मागील भागात असलेल्या इंजिनजवळून धूर येऊ लागल्याचे दिसत होते. हा धूर वाढताच काही वेळातच बसने पेट घेतला. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या जवनांनी व्यक्त केला आहे.

अग्निशामक दलाची तत्परता

बसने पेट घेतल्याचे समजताच पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाच्या रहाटणी केंद्रातील बंबाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत बस संपूर्णतः जळून खाक झाली होती. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आगीचा परिसरातील इतर वाहनांना आणि नागरिकांना धोका पोहोचला नाही.

सुरक्षा उपाययोजनांची गरज

या घटनेमुळे खासगी बसमध्ये प्रवास करणार्‍या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसची नियमित तपासणी व देखभाल करणे अनिवार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news