

पिंपरी: वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणार्या तसेच नियमबाह्य सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, अशा सूचना पीएमआरडी आयुक्तांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या आहेत. तसेच, नाल्याचा प्रवाह बदलणे, प्रवाह अडविणे त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले असून, अशा 13 जागांपैकी एका जागेवर अनेक चुकीच्या बाबी निदर्शनास आल्या असून, त्यावर आता हातोडा पडणार आहे.
हिंजवडीतील विविध समस्यांप्रकरणी अतिक्रमणविरोधी विभाग सक्रिय झाला आहे. यापूर्वी हिंजवडी पोलिस ठाण्यात 4 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 13 पैकी चार ठिकाणी पीएमआरडीची हद्द असल्याने त्या ठिकाणी जलद गतीने कारवाई करण्यात आली. (Latest Pimpri News)
आता त्यापैकी एका जागेवर अनेक त्रुटी आणि निमयांचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, अनेकदा सांगूनही प्रवाह खुला केला नसल्याने त्यावर हातोडा पडणार आहे. त्याबातची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
हिंजवडी, माण आणि मारुंजी भागातील नैसर्गिक ओढे - नाल्यांभोवती अनधिकृतपणे बांधकाम तसेच पाण्याचा प्रवाह अडवल्यासह परस्पर इतरत्र वळल्याने काही दिवसापूर्वी हिंजवडीत पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, 15 पैकी दोन ठिकाणी हे एमआयडीसी तर, अन्य ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांनी केवळ नोटिसा दिल्या असून, अद्याप पुढील कारवाई केली नाही.