Pcmc News: बांधकाम परवान्यांची खिरापत; सुविधांची गफलत: पीएमआरडीए, एमआयडीसी अन् स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये समन्वयाचा अभाव

अवघ्या काही वर्षांतच जगाच्या पाठीवर नावारुपास आलेल्या हिंजवडी आयटी पार्कची ठोस उपाययोजना व स्थानिक संस्थांच्या दुर्लक्षामुळे दुर्दशा
pimpari chinchwad
Pcmc NewsPudhari
Published on
Updated on

पंकज खोले

पिंपरी : अवघ्या काही वर्षांतच जगाच्या पाठीवर नावारुपास आलेल्या हिंजवडी आयटी पार्कची ठोस उपाययोजना व स्थानिक संस्थांच्या दुर्लक्षामुळे दुर्दशा झाली आहे. शेकडो एकर जमीन संपादित करूनही एमआयडीसीकडून पायाभूत सुविधा न पुरविल्याने; तसेच बेकायदा बांधकामे आणि रस्त्यांच्याकडेला असणार्‍या अतिक्रमणांच्या अडथळ्यांच्या शर्यतीमुळे आयटी पार्कची अवस्था बकाल झाली आहे. आयटी पार्कलगत बांधकामे करण्यास परवानगी देऊन पीएमआरडीएने गल्ला भरला; मात्र नागरी समस्या सोडविण्याच्या अनास्थेने हिंजवडी आयटी पार्क समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. (pcmc Latest News)

गेल्या दहा वर्षांपासून हिंजवडी परिसरातील समस्या जैसे- थे आहेत. यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी समस्या सोडविण्यासाठी लक्ष घातले होते. त्या वेळी आयटीन्सला पार्किंग सुविधा देण्याचा मुद्दा पुढे आला होता. तसेच, अधिकारी, एमआयडीसी यांच्या झालेला चुका समोर आल्या होत्या. आयटी पार्कशी संबंधित रस्ते खुला करण्याबाबत त्यांनी आदेश दिले होते. मात्र, यानंतर स्थानिक अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आणि राजकीय अनास्थेपायी पुढे काही कार्यवाही झाली नाही.

pimpari chinchwad
Hinjawadi : हिंजवडीतील आयटी कंपनीत हेलिकॉप्टरमधून NSG कमांडो का आले? खरं कारण समोर

कचरा व्यवस्थापन याचबरोबर घनचकरा प्रकल्प, रस्ते याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे ठरले होते. यानंतर तब्बल सात वर्षांनंतर त्यापैकी एकावरही निर्णय झाला नाही. परिणामी, आयटी हब आणखीनच बकाल होत गेले.

एमआयडीसीकडून कागदी घोडे

हिंजवडी, माण या परिसरातील सर्वात मोठा परिसर हा एमआयडीसी विभागाकडे आहे; मात्र आजपर्यंत रस्त्यांचे रुंदीकरण करणे; तसेच दुरस्ती देखभाल होऊ शकली नाही. एवढेच काय पदपथावरील अतिक्रमणेदेखील हटवता आले नव्हते. आजही चार चौकातील अतिक्रमणे काढण्यात आलेली नाहीत. किंबहुना त्यावर सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.

मुळशी तालुक्यात 386 होर्डिंग

जिल्ह्यात सर्वाधित होर्डिंग्जची संख्या मुळशी 386 असल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले होते. त्यापैकी अनेक होर्डिंग हे रस्त्यास अडथळा ठरणारे, रस्त्यालगत होते. ही होर्डिंग काढण्याबाबत संबंधितांना नोटीस दिल्या होत्या; मात्र त्यावर कारवाई झाली नव्हती. अखेर 36 मीटर रस्त्याच्या मोजणी कामावेळी त्यावर कारवाई सुरू करण्यात आली. तर, काहींनी स्वतःहून होर्डिंग काढून घेतली आहेत.

pimpari chinchwad
Missing Women : बेपत्ता महिलांचा शोध आता मिशन मोडवर!

पायाभूत सुविधांमध्ये अपयश

मुळशी तालुक्यात बांधकाम परवानगीचे वाटप गेल्या तीन ते चार वर्षात मोठ्या प्रमाणात झाल्याचा आरोप होत आहे. त्यापैकी माण, म्हाळुंगे, फेज 3, लक्ष्मी चौक या ठिकाणी धनाढ्य बांधकाम व्यावसायिकांना मंजुरी देण्यात आल्या; मात्र त्यासाठी परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पीएमआरडीने पुढाकार घेतला नाही. केवळ मुळशीच नव्हे, तर तब्बल 9 तालुक्यांतील अनधिकृत बांधकामे, बेकायदा होर्डिंग उभारणीवर आजही नियंत्रण मिळवता आलेले नाही.

या हव्यात उपाययोजना

  • प्रमुख जंक्शनचा सिग्नल उभारणे, सुरू करणे

  • जॉमेट्रीक सर्कलचा रस्ता एकत्रित करणे

  • भुजबळ चौकातील खासगी बसेसचा थांबा हलविणे.

  • दोन ठिकाणी पोर्टेबल सिग्नल उभारणे

  • महामार्गावर उभ्या राहणार्‍या प्रवासी वाहनांवर कारवाई करणे.

  • सर्व्हेक्षणात आढळलेल्या बाबी

  • लक्ष्मी चौक ते मेझा 9 रस्त्यावरील बेकायदा पार्किंग

  • पाच ठिकाणी मेट्रोचे अपूर्ण काम, राडारोडा

  • मेझा 9, कस्तुरी चौकातील रस्त्याची दुरवस्था.

  • अवजड वाहनांची गर्दी

  • छत्रपती शिवाजी चौक, विनोदीवस्ती चौकातील अतिक्रमणे

  • इन्फोसीस फेज 1 रस्त्यावर पार्किंग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news