PMRDA GIS Portal: रिंगरोड, पूररेषा अन् गावहद्दीची माहिती एका क्लिकवर; 'पीएमआरडीए'चे 'जीआयएस' पोर्टल सज्ज

नागरिकांचे कार्यालयातील हेलपाटे थांबणार
PMRDA
PMRDA Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: पुणे महानगर विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नागरिक, गुंतवणूकदार, विकासक, वास्तुविशारद, अभियंते आणि विविध शासकीय विभागांना नियोजनविषयक माहिती सुलभ, पारदर्शक व डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी 'जीआयएस' (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टिम) आधारित सार्वजनिक पोर्टल विकसित केले आहे.

या डिजिटल सुविधेमुळे नागरिकांना प्रादेशिक नियोजनाची सर्व प्राथमिक माहिती एकाच ठिकाणी आणि घरबसल्या उपलब्ध होणार आहे.

PMRDA
Pimpri Chinchwad NCP Strategy: शहर राष्ट्रवादीचा ‘भाजप पॅटर्न’; एसआयआर मोहिमेसाठी कार्यकर्त्यांची नेमणूक

या सार्वजनिक 'जीआयएस' पोर्टलवर 'पीएमआरडीए' कार्यक्षेत्राची सीमा, मंजूर प्रादेशिक योजना (आरपी), प्रस्तावित नगररचना योजना (टीपी स्कीम), गावहद्द तसेच महापालिका व नगर परिषदांच्या सीमांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यासोबतच एमएसआरडीसी व पीएमआरडीए रिंगरोड, पुणे मेट्रो मार्ग, रेल्वे मार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वर्गीकृत रस्ते आणि मेट्रो स्थानकांभोवतीचे टीओडी (ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट) झोन या पायाभूत सुविधांच्या लेअर्सचाही समावेश आहे.

PMRDA
LPG Gas Cylinder Shortage: शुल्क भरूनही गॅस कनेक्शनची प्रतीक्षाच!

पर्यावरण व सुरक्षेच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाच्या पूर लाल व निळ्या रेषा, वन्यजीव अभयारण्य, हिल स्टेशन व टाउनशिपच्या सीमा तसेच एनडीए, एचईएमआरएल, एमएडीसी (पुरंदर विमानतळ) आणि इतर संरक्षण विभागांचे बफर झोन यांची माहितीही या पोर्टलवर टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या पोर्टलमुळे भूखंड किंवा मालमत्तेच्या परिसरातील नियोजनाची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना 'पीएमआरडीए' कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. विकासक, वास्तुविशारद व अभियंत्यांना विकास प्रस्ताव तयार करताना आवश्यक असणारी अधिकृत प्राथमिक माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे नियोजन प्रक्रियेतील पारदर्शकता वाढून विविध शासकीय विभागांमधील माहितीचा समन्वय सुधारण्यास मदत होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने 'डिजिटल गव्हर्नन्स'ला चालना देणे आणि शाश्वत विकासासाठी माहिती आधारित निर्णय घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

पीएमआरडीए'च्या कार्यक्षेत्रातील नियोजन आणि विकासप्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हे जीआयएस आधारित सार्वजनिक पोर्टल महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांना आता त्यांच्या भूखंडाच्या परिसरातील रस्ते, पूररेषा, मेट्रो मार्ग आणि प्रादेशिक नियोजनाची अधिकृत प्राथमिक माहिती घरबसल्या एका क्लिकवर मिळणार आहे.

- डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त, पीएमआरडीए.

logo
Pudhari News
pudhari.news