PMPML Bus Facilities Issues: कोट्यवधींच्या बसमध्ये सोयीसुविधांचा बोजवारा; पीएमपीएमएलचे दुर्लक्ष

आसनव्यवस्था, स्वच्छता, प्रवाशांच्या सुरक्षेकडे कानाडोळा
PMPML Bus Facilities
कोट्यवधींच्या बसमध्ये सोयीसुविधांचा बोजवाराPudhari
Published on
Updated on

बजरंग मासाळ

पिंपळे निलख: पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या ताफ्यात असलेल्या बहुतांश बसची दुरवस्था झाली आहे. पीएमपीच्या ताफ्यात तब्बल 50 लाखांची उछॠ व 2 कोटी रुपयांची ई-बस आहेत. वातानुकूलीत, डिजिटल स्क्रीन, आरामदायी आसने, दिव्यांगांसाठी सोयी, सुरक्षा कॅमेरे, मेडिसिन कीट आणि अग्निशमन बंब अशा सुविधा देण्याचा मोठा गाजावाजा झाला.

परंतु या सर्व सोयीसुविधा केवळ कागदोपत्रीच दिसून येत आहेत. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या बसमध्ये देखील प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. (Latest Pimpari chinchwad News)

PMPML Bus Facilities
P‌impri News: ‘हाफकीन‌’च्या सुधारणांसाठी प्रयत्नशील; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महामंडळास आश्वासन

पीएमपी बसमध्ये डावी बाजू महिलांसाठी राखीव असते. परंतु त्या जागी पुरुष बसतात. महिलांना जागा मिळविण्यासाठी वाद करावा लागत आहे. तसेच दिव्यांगांसाठी राखीव जागा असूनही त्यांना मिळवण्यासाठी इतर प्रवाशांना विनंती करावी लागते. सांगवी फाटा येथे थांबलेल्या बसच्या स्क्रीनवर हे स्थानक खराडी गाव असे चुकीचे नाव झळकते.

काही स्क्रिन बंद, काही अर्धवट. साउंड बॉक्स असूनही कोणतीही अनाऊन्समेंट होत नाही. बसमधील अनेक सीट्‌‍स फाटलेल्या, काही ठिकाणी कुशनच गायब, लोखंडी रॉड बाहेर आलेले. बस अचानक थांबल्यावर दरवाजे जोरात उघडून प्रवाशांना इजा होण्याचा धोका संभवतो. कोट्यवधी रुपये खर्च करून घेतलेल्या बस देखभाल दुरुस्ती अभावी तशाच वापरल्या जात आहेत.

मेडिकीट शोभेची वस्तू

पीएमपी बसमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ उपचार करण्यासाठी मेडिसीन बॉक्स अथवा पेटी असते. त्यासाठी महापालिका प्रशासन खर्च करत आहे. परंतु पीएमपीएमएल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने बहुतांश बसमधील मेडिकीट केवळ शोभेची वस्तू बनले आहे. त्यात मेडिसीन नसतात. केवळ मोकळा व तुटलेला बॉक्स मेडिकीट लिहिलेला दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये सेवा मिळू शकत नाही. तरी देखील बस बिनधास्तपणे रस्त्यावर धावत आहेत. याकडे पीएमपी प्रशासन, आरटीओ दुर्लक्ष करत आहे.

पाहणीत आढळल्या या त्रुटी

  • अनेक बसमधील अग्निशामक यंत्र मुदत संपलेले अथवा गायब आहेत.

  • गॅस भरण्याच्या नोजलजवळील छोटा दरवाजा तुटलेला, त्यामुळे नोजल उघड्यावर.

  • अपात्कालीन प्रसंगी वापरण्यासाठी असलेले हातोडे बसमधून गायब.

  • अनेक बसमधील आसनव्यवस्थांची दुरवस्था

  • अनेक बसचे छत गळत असल्याने पावसात प्रवास करताना पाणी प्रवाशांच्या अंगावर पडत आहे.

हँडिकॅप सर्टिफिकेट असूनही प्रवासी पास फक्त स्थानिक विद्यार्थ्यांनाच दिला जातो. मी कोचिंग क्लाससाठी आलोय, रोज मानकर चौक ते चिखली 60 रुपये जातात. चिखलीहून हिंजवडीकडे अडीच तास बस मिळत नाही.

- सत्यजीत वाबळे, विद्यार्थी.

आयटी विभागाला तांत्रिक त्रुटींची तत्काळ पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. मेंटनन्स विभागालाही गाड्यांची तपासणी करून डागडुजी करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या अग्निशामक यंत्रांची मुदत संपली आहे तेथे नवीन टाकले जातील. ज्या बसमध्ये यंत्र नाही तेथे नवीन बसविले जाईल. यापुढे सर्व समस्यांवर विभागीय कर्मचाऱ्यांना सूचना देऊन मी स्वतः फील्ड व्हिजिट करेन व तातडीने उपाययोजना करण्यात येतील.

- राजेश कुदळे, मुख्य अभियंता, पीएमपीएमएल.

मागील भाग पाहण्यासाठी बसमधील कॅमेऱ्यावर धूळ व तेलकट थर बसलेला असतो. साफसफाई न झाल्याने मागचा भाग दिसत नाही. काही चालकांनी मागणी केली की चालक-वाहक निर्व्यसनी असावेत, अन्यथा प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड होते.

- महेश परदेशी, चालक.

आमच्या राखीव जागेसाठी वाहकांनी सहकार्य करून ती जागा आम्हाला मिळवून द्यायला हवी. सुविधा दाखवतात, पण अंमलबजावणी होत नाही.

- सचिन दामले, दिव्यांग प्रवासी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news