

पिंपरी : पिंपरी बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांची आवक वाढली आहे. भेंडी, वांगी, टोमॅटो, मटार, फ्लॉवर यांसह कोथिंबिर, कांदापात, पालक भाज्यांचे दर कमी झाले आहेत; मात्र शेवग्याचे दर अजूनही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.
मोशी उपबाजारामध्ये भाज्यांची आवक वाढल्याने तेथील दरही कमी झाले होते. 500 रुपये प्रतिकिलो विक्री होणारा शेवगा आता 300 रुपयांनी विक्री केला जात आहे. नाशिक भागातून पिंपरी मंडईत दाखल झालेल्या डबल बीन्सचा दर 200 रुपये प्रति किलो आहे; तसेच, 62 हजार पालेभाज्याच्या गड्डयाची आवक झाली आहे. त्यात कोथिंबीर, मेथी, पालक याची सर्वाधिक आवक आहे. मटारचे दर गेल्या आठवडयाच्या तुलनेत कमी झाले आहेत. वांगी 60 रुपये किलोने विक्री केली जात आहे. भेंडी 90 वरून 50 रुपये किलोने विक्री केली जात आहे. तसेच, गाजाराची देखील आवक झाली असून, 40 रुपये किलोने विक्री केली जात आहे.
कोथिंबीर : 10, मेथी : 25 ते 30, शेपू : 15 ते 20, कांदापात : 20, पालक : 15 ते 20, पुदिना : 10 असे पालेभाज्यांचे प्रति जुडी दर आहेत.
कांदा : 18 ते 20, बटाटा : 30 ते 40, लसूण : 120 ते 140, आले : 80 ते 100, भेंडी : 60 ते 70, गवार : 100 ते 120, टोमॅटो : 20 ते 30, मटार : 80, घेवडा : 60, राजमा : 70, दोडका : 80, मिरची : 50, दुधी भोपळा : 40, काकडी : 30, कारली : 50 ते 60, डांगर : 25 ते 30, गाजर : 40 ते 50, पापडी : 60, पडवळ : 80, फ्लॉवर : 50 ते 60, कोबी : 30, वांगी : 60 ते 70, ढोबळी : 80, बीट : 60, पावटा : 80, वाल : 60, रताळी : 60, शेवगा : 300 ते 350, चवळी : 60, घोसाळी : 60, कडिपत्ता : 80 ते 100, लिंबू : 40, मका कणीस : 40, सुरण : 60 ते 70, तोंडली : 60 रुपये किलो.
सफरचंद : 100 ते 120, मोसंबी : 70, संत्रा : 100 ते 160, डाळिंब : 200 ते 240, पेरू : 100, पपई : 50 ते 60, चिक्कू : 100 ते 120, केळी : 100, केव्ही : 100, सीताफळ : 70, अननस : 100 ते 120, स्टोबेरी : 300, बोरं : 70, आवळा : 100, पेर : 240, खरबूज : 60, कलिंगड : 40 ते 50, अंजीर : 200 रुपये किलो.