

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील यशवंतनगर येथील सरस्वती विद्यामंदिर समोर शुक्रवारी(दि.३१) सायंकाळी ५ च्या सुमारास आर्यन उर्फ दादू शंकर बेडेकर (वय-१९)राहणार सिध्दार्थ नगर तळेगाव स्टेशन ता.मावळ जि.पुणे या युवकाचा धारदार शस्राने खून करण्यात आला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार हल्लेखोर ४जण असून ते पसार झाले आहेत.जून्या वादातून हा खून झाल्याचे समजते.