Crime News: जुगार अड्ड्यांवर हल्लाबोल; 27 जणांना अटक; सराईतासह 31जणांवर गुन्हा

पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई
Pcmc News
जुगार अड्ड्यांवर हल्लाबोलPudhari
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारत शहरातील जुगार अड्ड्यांवर मोठी मोहीम राबवली. चाकण, दिघी, चिखली आणि हिंजवडी परिसरातील सहा ठिकाणी एकाच दिवशी टाकलेल्या छाप्यात 27 जणांना अटक करण्यात आली. यामध्ये सराईत धंदेवाल्यांचा समावेश आहे. अटक आरोपींसह 31 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले असून, 34 लाख 14 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे. (latest Pimpari chinchwad News)

मुद्देमाल जप्त

या कारवाईत 26 मोबाईल फोन, तीन कार, पाच दुचाकी, तसेच रोख रकमेसह एकूण 34 लाख 14 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. यामुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अवैध धंद्यांवर पोलिसांचा धडाका

आगामी गणेशोत्सव, नवरात्र, ईद आणि निवडणुकांचा काळ लक्षात घेऊन पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. बेकायदेशीर शस्त्र जप्ती मोहिमेत आतापर्यंत 130 हून अधिक घातक शस्त्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. त्याचसोबत दारू भट्ट्या, अवैध दारू विक्री-वाहतूक, तसेच प्रतिबंधित गुटखा विक्री व साठवणूक यावरही कारवायांची मालिका सुरू आहे. जुगार अड्ड्यांवरील ही मोठी मोहीम त्याच धडाक्याचा भाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Pcmc News
Flower price increase : गणेशोत्सवानिमित्त फुलांना आला सोन्याचा भाव

अटक आरोपींची यादी

छाप्यात अटक करण्यात आलेल्यांत शुभम गणेश सांळुके (30, रा. विश्रांतवाडी), मयुर सुदाम धापटे (29, रा. कलस, हवेली), आकाश नवनाथ चौधरी (29, रा. पिंपरी), हुकूमसिंग डीडीसिंग कल्याणी (39, रा. हडपसर), संतोष सदाशिव राखपसरे (45, रा. लोहगाव), उमेश सोपान प्रधान (34, रा. मोशी), किशोर रामचंद्र पाटोळे (41, रा. हडपसर), शरद काशीनाथ शेडगे (42, रा. महाळुंगे पाडाळे), मनी उर्फ जॉकी भगवान तिवारी (28, रा. विमाननगर), अतुल राजू देवकर (34, रा. विश्रांतवाडी), जालिदंर मधुकर शिंदे (43, रा. भोसरी), सुशांत जालिंदर पवार (28, रा. पुरंदर), सुरेश उर्फ जॉकी किसन राठोड (31, रा. पिंपळे गुरव), गणपत विठ्ठल लांडगे (62, रा. भोसरी), दशरथ उर्फ जॉकी अमरसिंग पवार (34, रा. विश्रांतवाडी), अंकुश उर्फ जॉकी गायकवाड (33, रा. निगडी), निखिल राजू देवकर (31, रा. विश्रांतवाडी), गुड्डू उर्फ जॉकी रणजित रवाणी (34, रा. हडपसर), पवन पंडीत मौजे (33, रा. लोहगाव), मारुती उर्फ जॉकी ईश्वर सुरवसे (30, रा. मुंढवा), अतुल अमृत मोहिते (32, रा. आंबेठाण), प्रणय अंकुश जाधव (20, रा. दिघी), अक्षय गोरक्षनाथ बोकड (26, रा. दिघी), मंगेश कैलास भिंगारे (23, रा. दिघी), सुधीर हरजितरॉय नागपाल (60, रा. अहिल्यानगर), अन्सार साहेबलाल शेख (64, रा. हडपसर), वसंत नामदेव बोऱहाडे (47, रा. चऱहोली खुर्द) यांचा समावेश आहे. याशिवाय निरंजन तुळशीदास मंगळवेडेकर (रा.चिंचवड), केतन झोरे (रा. चऱहोली बुद्रुक), रासकर (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही. आणि इतर तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांचा इशारा

शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईची मालिका सुरूच राहील. नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा आणणार्‍यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा इशारा पोलिस आयुक्त चौबे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news