October Heat: पिंपरी-चिंचवडमध्ये ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान ३४.७ अंशांवर

Pimpri Chinchwad Temperature: ७० टक्क्यांहून अधिक आर्द्रतेमुळे ३८ ते ३९ अंशांपेक्षा जास्त उकाडा जाणवतोय; पुढील ३ ते ४ दिवस उष्णता कायम राहण्याची शक्यता
October Heat
October Heat Pudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: ऑक्टोबर हिटचा तडाखा पिंपरी-चिंचवडकरांना बसू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, बुधवारी शहराचे कमाल तापमान ३४.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सकाळपासूनच कडक ऊन आणि दमट हवामानामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून परतीच्या प्रवासावर असला तरी आर्द्रता अजूनही 70 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तापमान ३४ अंश असले तरी प्रत्यक्षात ३८ ते ३९ अंशापेक्षा जास्त गरम जाणवत आहे.

October Heat
Pradeep Sweets: प्रदीप स्वीट्सच्या खाद्यपदार्थांबाबत मोठे अपडेट; FDA नमुने प्रयोगशाळेत, अहवालाची प्रतीक्षा

वाकड, हिंजवडी, भोसरी, निगडी या आयटी आणि औद्योगिक पट्ट्यात उन्हाचा सर्वाधिक फटका बसत आहे. दुचाकीस्वार, बांधकाम कामगार आणि शाळेतील मुलांना या उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुढील ३ ते ४ दिवस शहरात अशीच स्थिती राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news