Fugewadi Illegal Building Demolition: फुगेवाडीतील ‌‘तो‌’ दारूअड्डा महापालिकेने पाडला

दरम्यान, घटनास्थळी पोलिस आयुक्त विजयकुमार चौबे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच, कारवाईचा आढावा घेतला.
Fugewadi Illegal Building Demolition
Fugewadi Illegal Building DemolitionPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या वतीने ह क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने फुगेवाडीतील संजयनगर येथे सुरू असलेला दारूअड्डाची अनधिकृत इमारत गुरुवारी (दि. 4) पाडण्यात आली. कारवाई एकूण 875 चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यात आले.

महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे व कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उमेश मोने यांच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली. दरम्यान, घटनास्थळी पोलिस आयुक्त विजयकुमार चौबे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच, कारवाईचा आढावा घेतला.

Fugewadi Illegal Building Demolition
Pawana Dam Water Storage: पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ 23 टक्के जलसाठा शिल्लक

दारूअड्डा अनधिकृत असल्याने महापालिकेची कारवाई

विषारी गावठी दारू प्राशन केल्यामुळे फुगेवाडी आणि हडपसरमध्ये झालेल्या मृत्यू तांडवामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. विषारी दारू पिल्यानंतर फुगेवाडीतील तब्बल 17 जणांनी जीव गमावला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधारासह आठ जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी गुरमंगतसिंह कर्नेलसिंह वीरका या आरोपीचाही समावेश आहे.

वीरका हा फुगेवाडी येथील ज्या घरातून हा दारूअड्डा चालवत होता. तो अड्डा आणि बांधकाम महापालिकेच्या पडताळणीत अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याला महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाकडून बुधवारी (दि. 3) नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे पुढच्या 24 तासांत हे बांधकाम अधिकृत असल्याचे पुरावे सादर करावेत.

Fugewadi Illegal Building Demolition
Sangvi Encroachment Footpath Issue: सांगवीत पदपथांवर अतिक्रमणाचा विळखा; नागरिकांचा जीव धोक्यात

बांधकाम अधिकृत असल्याचे कोणतेही पुरावे नसल्यास ते बांधकाम स्वतःहून काढून घ्यावे; अन्यथा महापालिकेच्या माध्यमातून ते बांधकाम पाडण्यात येईल, असे नोटिशीत नमूद होते. त्यानंतर आज त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news