Pimpri Chinchwad RTE Admission 2026: आरटीई प्रवेश 2026-27: पिंपरी-चिंचवडमधील केवळ 99 शाळांची नोंदणी

263 पात्र शाळांपैकी अल्प प्रतिसाद; शाळा नोंदणीस 27 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
RTE
RTEPudhari
Published on
Updated on

पिंपरी: आरटीईअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026 - 27 साठी शहरातील खासगी शाळांत आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रिया लागू असणाऱ्या शाळांची नोंदणीप्रक्रिया 9 ते 19 जानेवारीदरम्यान राबविण्यात आली. सोमवारी शेवटच्या आरटीई प्रवेशास पात्र असणाऱ्या 263 शाळांपैकी फक्त 99 शाळांची आरटीईसाठी नोंद झाली आहे. शाळांची नोंदणी संख्येत वाढ होण्यासाठी 27 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

RTE
PCMC Election Result Analysis: पीसीएमसी निवडणूक 2026: निसटत्या फरकांनी ठरले अनेक प्रभागांचे निकाल

आकुर्डी विभागातून 47 आणि पिंपरी विभागातून 26 शाळांनी नोंदणी केली आहे. शाळा नोंदणी झाल्यानंतर प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात येणार आहे. मात्र, अकरा दिवसांत नोंदणीला शाळांचा कमी प्रतिसाद मिळाला आहे. यंदा पालिकेच्या निवडणुकांच्या कामकाजामध्ये शाळांचे शिक्षक आणि पालिकेचे कर्मचारी गुंतल्याने शाळा नोंदणीसाठी कमी प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंदाही शाळा नोंदणीस 27 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

RTE
PCMC Election 2026: पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सलग दुसरी सत्ता, महापौर निवडीची तयारी सुरू

‌‘आरटीई‌’अंतर्गत शहरातील शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सर्व शाळांचे मॅपिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर ‌‘आरटीई‌’तून प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवून घेतले जातील. पालकांना शाळांचा प्राधान्यक्रम द्यावा लागेल आणि त्यानुसार त्यांना संबंधित शाळांमध्ये प्रवेश मिळतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news