PCMC Marathi Language Employees Incentive: पीसीएमसीमध्ये मराठी कर्मचाऱ्यांना विशेष वेतनवाढ; विधी समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय

मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी एम.ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढीचा प्रस्ताव
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर व्हावा. महापालिकेचा व्यवहार अधिक सोपा, सुटसुटीत व अर्थपूर्ण भाषेत व्हावा, या उद्देशाने एम. ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा ठराव विधी समितीच्या विशेष बैठकीत करण्यात आला आहे. ता ठराव अंतिम मंजुरीसाठी महापालिका सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Akurdi Traffic Signal Issue: आकुर्डी म्हाळसाकांत चौकात सिग्नल बंद; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

विधी समितीची बैठक सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला समितीचे सदस्य ज्ञानेश्वर जगताप, कुशाग्र कदम, वर्षा जगताप, तुषार सहाणे, कुंदा भिसे, शेखर चिंचवडे, सहआयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त राजेश आगळे आदी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Sangvi Phata Road Accident Safety Issue: सांगवी फाटा मृत्यूचा सापळा; नागरिकांचा पादचारी पूल व सुरक्षिततेसाठी आक्रोश

मराठी भाषेला नवतंत्रज्ञानाने सुसज्ज करणे, सर्वसामान्यांना समजेल अशी प्रशासकीय मराठी विकसित करणे. बोली भाषांचे जतन व संवर्धन करणे, या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शासनामार्फत विविध शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने विधी समितीने एम.ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा ठराव केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news