Old Sangvi Stray Cattle Traffic Problem: जुनी सांगवीत माकन चौकात मोकाट जनावरांचा ठिय्या; वाहतुकीला मोठा अडथळा

रस्त्याच्या मधोमध बसलेल्या जनावरांमुळे अपघाताचा धोका वाढला; नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी
Stray Cattle Traffic Problem
Stray Cattle Traffic ProblemPudhari
Published on
Updated on

पिंपळे गुरव: जुनी सांगवी येथील माकन चौकातील मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांनी अक्षरशः ठिय्या मांडल्याचे चित्र दिसत आहे. नवी सांगवी व औंधकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. परिसरात दुकाने, हॉटेल्स, दवाखाने, बँका तसेच शैक्षणिक संस्था असल्याने सकाळ-संध्याकाळ वाहतुकीचा ताण वाढलेला असतो. अशा गर्दीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध जनावरे बसलेली असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

Stray Cattle Traffic Problem
Pimpri Chinchwad Water Supply Disruption: पिंपरी-चिंचवडमध्ये तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प; निगडी, रावेत, आकुर्डीत नागरिक संतप्त

उपाययोजना

  • मोकाट जनावरांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवावी

  • जनावरांच्या मालकांची ओळख पटवून दंडात्मक कारवाई करावी

  • सीसीटीव्हीच्या माध्यमातून जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्यांवर लक्ष ठेवावे

  • नागरिकांमध्ये जनजागृती करावी

  • चौकात सिग्नल व योग्य प्रकाशयोजना उभारावी

वाहतुकीला अडथळा

वाहनचालकांना जनावरांना वळसा घालत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चौकातच जनावरांनी ठिय्या मांडल्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार यापूर्वी काही किरकोळ अपघात घडले असून, सुदैवाने गंभीर घटना टळल्या आहेत. मात्र, रात्रीच्यावेळी अपुरी प्रकाशयोजना आणि रस्त्याच्या मधोमध बसलेली जनावरे यामुळे वाहनचालकांसमोर अचानक अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाहनांचे संतुलन बिघडण्याची शक्यता वाढते.

Stray Cattle Traffic Problem
Marathi Spelling Awareness Campaign: ‘न’ आणि ‘ण’चा गोंधळ थांबवा! माधव राजगुरूंची मराठी शुद्धलेखन सुधार मोहीम वेगात

परिसरात घाणीचे सामाज्य

रस्त्यावर जनावरांचा वावर वाढल्याने शेण व घाणीचे ढीग साचत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून, माशा व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जवळच अन्नपदार्थांची दुकाने व हॉटेल्स असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्यादृष्टीनेही ही स्थिती चिंताजनक ठरत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी देण्यात आल्या आहेत. काही वेळा जनावरे पकडण्याची कारवाई होते. मात्र, काही दिवसांतच ती पुन्हा त्याच ठिकाणी दिसतात. त्यामुळे कारवाई केवळ कागदोपत्री राहते, असा आरोप नागरिक करत आहेत.

Stray Cattle Traffic Problem
Maharashtra RTE Admission 2026: आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल; किमान 10 शाळांची निवड बंधनकारक

अपघाताची भीती

गर्दीच्या मुख्य मार्गावर अशी परिस्थिती कायम राहिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रशासनाने तातडीने आणि ठोस पावले उचलावीत. अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. जुनी सांगवीतील ही गंभीर समस्या तात्काळ मार्गी लावून सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची हमी द्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Stray Cattle Traffic Problem
Pimpri Brahminy Duck Sighting: ताथवडे घाटावर दुर्मिळ ब्राह्मणी बदकांच्या जोडीचे आगमन; पक्षीप्रेमींमध्ये उत्साह

जनावरे नेमकी कोणाची आहेत ते आधी पहावे लागेल. मालकाचा शोध घेऊन त्यांना जनावरे तात्काळ नेण्यास सांगितले जाईल. संबंधित भागात पथक पाठवून मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबवली जाईल.

अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका

सांगवी, नवी सांगवी भागातील मुख्य चौकांमध्ये मोकाट कुत्रे आणि जनावरे बसलेली असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. चौकात शेण पडल्यामुळे दुचाकी घसरून अपघातही झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी.

मंदाकिनी तनपुरे, सामाजिक कार्यकर्त्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news