Nigdi Metro Pipeline Damage: निगडीतील मेट्रोच्या कामात जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाण्याची नासाडी

टिळक चौकात जेसीबीच्या खोदकामामुळे महापालिकेची जलवाहिनी फुटली; महामेट्रोच्या ठेकेदारावर निष्काळजीपणाचा आरोप
Nigdi Metro Pipeline Damage
Nigdi Metro Pipeline DamagePudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: महामेट्रोकडून निगडी ते पिंपरी या मार्गावरील मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. काम करताना निगडी येथील टिळक चौकातील बस थांबा येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेची जलवाहिनी फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. ती घटना बुधवारी (दि.11) सायंकाळी घडली. राज्यातील दुष्काळ परिस्थितीत अशा प्रकारे पिण्याचे पाणी वाया गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केले जात आहे.

Nigdi Metro Pipeline Damage
Ravet Firecracker Fire: रावेतमध्ये फटाक्याच्या रॉकेटमुळे मैदानातील गवताला आग; अग्निशमन दलामुळे मोठी दुर्घटना टळली

महामेट्रोकडून स्टेशनच्या पिलरसाठी खोदकाम सुरू आहे. जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असताना अचानक जलवाहिनी फुटली. त्यात चौकात रस्त्यावर पाणीच पाणी झाले. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. त्या पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागली. त्याचा नागरिकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यात लाखो लिटर पाणी वाया गेले.

Nigdi Metro Pipeline Damage
Pimpri Chinchwad Zebra Crossing: साहेब तुम्हीच सांगा, रस्ता ओलांडायचा कसा?

महामेट्रोच्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे. काम करताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे पाण्याची नाहक नासाडी झाली आहे. या पूर्वी चार ते पाच वेळा जलाहिनी फुटण्याचे प्रकार घडले आहेत. त्यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महामेट्रोला नोटीसही बजावली आहे.

Nigdi Metro Pipeline Damage
Chikhali Suspicious Death: चिखलीत २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ दगड आढळल्याने खुनाचा संशय

मात्र, मेट्रोच्या कामात सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही बाब महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास समजताच त्यांनी त्या वाहिनीतून पाणीपुरवठा बंद केला. त्यानंतर दुरूस्ती काम हाती घेण्यात आले. ते काम दुसर्‍या दिवशी गुरूवारी (दि.12) सकाळी पूर्ण झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.