पालिकेच्या 6 रुग्णालयांत नवीन सोनोग्राफी मशीन

वायसीएममधील सोनोग्राफी मशीनच्या संख्येत वाढ
PCMC
पालिकेच्या 6 रुग्णालयांत नवीन सोनोग्राफी मशीन File Photo
Published on
Updated on

पिंपरी: महापालिकेच्या 6 रुग्णालयांसाठी नवीन सोनोग्राफी मशीन दाखल झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. महापालिकेचे पिंपरी-संत तुकारामनगर येथे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्था हे प्रमुख रुग्णालय आहे. त्याशिवाय, आकुर्डी, भोसरी, थेरगाव, सांगवी, यमुनानगर या रुग्णालयांसह जिजामाता रुग्णालय (पिंपरी) आणि तालेरा रुग्णालय (चिंचवडगाव) आदी रुग्णालये आहेत.

या रुग्णालयांपैकी काही रुग्णालयांमध्ये एकच सोनोग्राफी मशीन आहे. त्यांना नवीन सोनोग्राफी मशीन मिळाल्याने त्यांची गैरसोय दूर झाली आहे. पर्यायाने, आता संबंधित रुग्णालयांमध्ये महिलांना प्रसूतीपूर्व करावी लागणारी सोनोग्राफी तसेच, स्त्रीरोगावर निदान आणि उपचारासाठी करावी लागणारी सोनोग्राफी करण्यात येणार्‍या अडचणी दूर होणार आहेत.

वायसीएममधील सोनोग्राफी मशीनच्या संख्येत वाढ

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये यापूर्वी 3 सोनोग्राफी मशीन आहेत. अ‍ॅनेस्थेशिया विभागासाठी रुग्णालय प्रशासनाने आता नव्याने दाखल झालेली सोनोग्राफी मशीन घेतली आहे. त्यामुळे आता रुग्णालयात एकूण 4 सोनोग्राफी मशीन झाल्या आहेत.

महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, तालेरा रुग्णालय, आकुर्डी, भोसरी आणि थेरगाव रुग्णालय येथे प्रत्येकी एक सोनोग्राफी मशीन दिली आहे. त्यामुळे रुग्णांची चांगली सोय होणार आहे.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news