राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा राजीनामा

अजित गव्हाणे यांनी शरद पवार यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती
NCP City President Ajit Gavhane
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेPudhari
Published on
Updated on

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे पक्ष पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

अजित पवारांच्या कट्टर समर्थकांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा भोसरीतील माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, नेहरूनगर येथील माजी नगरसेवक तथा पक्षाचे शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले, ताथवडे येथील माजी नगरसेवक तथा पक्षाचे भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष तथा चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते यश साने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आले. ते सर्व अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते.

NCP City President Ajit Gavhane
भ्रष्टाचार लपविण्यासाठी कचरा डेपोस आग ; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा आरोप

लोकसभेच्या अपयशाच्या आधारावर निर्णय?

अजित गव्हाणे यांनी काही माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती. तेव्हापासून ते सर्व शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांची साथ सोडत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित झाल्याचे मानले जात आहे. लवकरच ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा शहरात रंगली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे पक्षाची तुतारी हातात घेण्यासाठी अनेकांची पावले त्या पक्षाकडे वळत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news