Sunetra Pawar : खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतली महापालिका आयुक्ताची भेट

न्याय मिळावा म्हणून स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचा खटाटोप
suneta pawar
सुनेत्रा पवारpudhari
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. आज याचं पिंपरी चिंचवडमध्ये अजित दादांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवारांना लक्ष घालण्याची वेळ आली आहे. राष्ट्वादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची सूचना केली आहे. त्यावर अंमलबजावणी करा, अश्या सूचना त्यांनी आयुक्ताना केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यावर दबाव असू शकतो. मात्र, आमचे अजित दादा उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आमचा ही दबाव आयुक्तांवर असायला हवा. असे स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे मत आहे. त्याबाबत पक्षात नाराजीचा सूर आहे. त्या अनुषंगाने सुनेत्रा पवारांनी आज महापालिका आयुक्तांना अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलेल्या कामांची तरतूद करावी, अशा सूचना त् दिल्या. 21 फेब्रुवारीला सादर झालेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात आयुक्तांनी भाजपला झुकतं माप दिले, असा राष्ट्रवादीचा आरोप आहे. तसाच न्याय मिळावा म्हणून स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसने हा खटाटोप केला आहे. यानिमित्ताने भाजप-राष्ट्रवादीत बजेटसाठी चढाओढ सुरु झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news