Moshi IIM Training Centre: मोशीत उभे राहणार आयआयएमचे भव्य प्रशिक्षण केंद्र; २८ हेक्टर जागा ९८ वर्षांसाठी नाममात्र दरात मंजूर

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची मान्यता; उद्योजक, अधिकारी आणि विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन प्रशिक्षणाची नवी संधी, पिंपरी-चिंचवडच्या विकासाला चालना
IIM
IIMPudhari
Published on
Updated on

पिंपरी: मोशी येथील गट क्रमांक 327 येथे नागपूर येथील भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम)चे प्रशिक्षण आणि शिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या संस्थेला 28 हेक्‍टर जागा प्रथम 49 वर्षांसाठी त्यानंतर पुन्हा 49 वर्षासाठी असे एकूण 98 वर्षांसाठी दरवर्षी 1 रुपया नाममात्र दराने देण्यास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे मोशीत त्या नामांकित शैक्षणिक संस्था उभी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी (दि.14) दिली.

IIM
Pimpri Chinchwad Industrial Employment Gap: पिंपरी-चिंचवडच्या उद्योगनगरीत विचित्र स्थिती; कंपन्यांना कामगार हवे, तर युवकांना हवी ‘योग्य’ नोकरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार रिक्रीएशन कॉम्प्लेक्सचे आरक्षण आहे. ते बदलून शैक्षणिक प्रयोजन करण्याच्या अटीवर ती जागा भाडेपट्टयाने प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

IIM
Ravet Police Rescue: रावेत पोलिसांचे प्रसंगावधान! आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मृत्यूच्या दारातून वाचवले

त्याला मंत्रिमंडळाच्या 21जून2026च्या बैठकीत मंजुरी दिली होती. त्या 28 हेक्टर जागेत आयआयएमकडून शैक्षणिक व प्रशिक्षण संकुल उभारण्यात येणार आहे. या शैक्षणिक संकुलात अल्पमुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम किंवा व्यवस्थापन विकास कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील उद्योजक, शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना प्राधान्य किंवा सवलत देण्यात येणार आहे.

IIM
Maval Scholarship Exam Result: मावळच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल चिंताजनक; ५०८३ पैकी तब्बल ३८११ विद्यार्थी नापास

जागेची पाहणी करण्यात आली असून, ती मोकळी असल्याचे 5 फेब्रुवारी 2025 ला सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, 28 हेक्टर जागा आयआयएम संस्थेला नाममात्र दराने भाडेपट्ट्याने देण्यास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतीच मान्यता दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news