

पिंपरी: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार ( दि. 3) पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच, शुक्रवार व शनिवार या दोन दिवशी पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता एमआयडीसीने व्यक्त केली आहे. (Latest Pimpri News)
रावेत उपविभाग येथील विद्युत आणि यांत्रिकी उप विभागामार्फत करण्यात येणार्या दुरुस्ती कामकाजासाठी पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, आरअॅण्डडी दिघी, व्हीएसएलएल, कॅन्टोमेंट बोर्ड, ओएफडीआर या भागातील पाणी बंद राहणार आहे. तरी, त्याची नोंद घेऊन आवश्यक तो साठा करावा, असे आवाहन स्थापत्य विभागाकडून करण्यात आले आहे.