

पिंपरी : पिंपरी फळबाजारात आंब्यांची आवक होऊ लागली आहे. सध्या हापूस, बदाम आणि लालबाग आंबे विक्रीस उपलब्ध आहेत; मात्र इतरांच्या तुलनेत हापूस आंब्याचे दर जास्त असल्याने ग्राहकांकडून मागणी कमी असल्याचे दिसून येत आहे.
साधारणपणे फेबु्रवारी महिना संपत आला की, बाजारात विविध जातीच्या आंब्यांची आवक होऊ लागते. जास्तकरून ग्राहक हापूस आंबा खरेदीस पसंती देतात. सध्या बाजारात आंब्याची आवक झाली असून, हापूस आंब्याचा दर हजार ते बाराशे रुपये डझन आहे; तसेच वाढत्या तापमानामुळे रसाळ फळांना मागणी असल्याने खरबूज आणि कलिंगड यांना मागणी वाढली आहे.
पिंपरीतील फळ बाजारात कलिंगड आणि खरबूज यांना मागणी जास्त आहे. 25 ते 30 रुपये दराने विक्री होत आहे. ड्रॅगन फ्रूट 300 रुपये दराने विक्रीस आहेत. पेरू, पपई, अंजीर, द्राक्षे, केळी, कलिंगड, खरबूज, सफरचंद यांचे दर स्थिर आहेत.
सफरचंद 160- 280 रुपये, मोसंबी 100, संत्री 100 - 120, डाळिंब 120 - 250, पेरू 60, अंजीर 100 -140, पपई 40 - 50, दाक्षे-100, कलिंगड 20 -25, आंबा बदाम 200, लालबाग 200 - 230, हापूस 1200 -1600 रुपये डझन, केळी 40-50, खरबूज 30, अननस 80 -140, पिअर 200-240, स्ट्रॉबेरी 100 रुपये, किवी 120 -130.