Abortion Without Consent
पिंपरी: लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या नकळत रबडीमध्ये गर्भपाताची गोळी मिसळवून जबरदस्तीने गर्भपात केला. हा धक्कादायक प्रकार हिंजवडी येथे घडला आहे.
आदर्श मेश्राम (28, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी, मूळ रा. बल्हारशहा, जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव असून, एका 28 वर्षीय तरुणीने सोमवारी (दि. 7) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pimpri News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श मेश्राम याने लग्नाचे आमिष दाखवून संबंधित तरुणीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यामध्ये ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्या संमतीशिवाय नकळत रबडीमध्ये गर्भपाताची गोळी मिसळून ती खाऊ घातली.
त्यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिला लग्न करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तपास महिला सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.