Pimpri Fruad: कोट्यवधींची फसवणूक करणारा अटकेत

26 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
Pimpri Fruad
कोट्यवधींची फसवणूक करणारा अटकेत (File Photo)
Published on
Updated on

लोणावळा: लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत मागील सात महिन्यांपासून फरार असलेल्या एका हाय प्रोफाइल आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता 26 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे यांनी दिली.

आकाश अजिनाथ साळुंखे (वय 28, रा. हडपसर पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भावेश पटेल (रा. नवी मुंबई) यांनी जानेवारी महिन्यात या फसवणूक प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. (Latest Pune News)

Pimpri Fruad
Prafull Lodha: हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रफुल्ल लोढा बावधन पोलिसांच्या ताब्यात

नोंदणी झालेले दस्त केले लंपास

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी भावेश पटेल यांच्या फिर्यावरून दिलेल्या माहितीनुसार, भावेश पटेल यांचे वाकसई गावच्या हद्दीत वरसोली टोल नाका येथे सिल्वर स्टोन कन्स्ट्रक्शन कंपनी नावाने 52 बंगल्याची स्कीम बनवली होती. कामात नुकसान झाल्याने ते गुंतवणूकदार शोधत होते. तेव्हा त्यांची ओळख आकाश साळुंखे याच्यासोबत झाली.

एटीएस अधिकारी त्याचा भाऊ असल्याचे भासवत त्याने पटेल यांचा विश्वास संपादित करत त्यांना 42 कोटी रुपये देण्याचे मान्य करत कंपनीचे 80 टक्के शेअर नावावर करुन घेतले. त्या बदल्यात 42 कोटी रुपये रक्कमेचे 8 धनादेश त्याने पटले यांना दिले.

Pimpri Fruad
PCMC Ward Structure: पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर

मात्र, दस्तऐवज नोंद होताच त्याने धनादेशचे पेमेंट थांबवले. सदरचे नोंदणी झालेले दस्त हे पटेल यांच्या कार्यालयात होते तेथून ते दस्त आकाश याने न कळत लंपास केले व त्या आधारे सदर बंगले व मालमत्ता याची स्वतःच्या नावावर नोंद करण्यासाठी वाकसई तलाठी कार्यालयात प्रकरण दिले.

सातार्‍यातून केली अटक

नोंदणी पूर्वी तलाठी कार्यालयातून सर्वांना नोटिसा गेल्याने पटेल यांच्या निदर्शनास हे प्रकरण आले. त्यानंतर त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर त्याने सदरचे दस्त रद्द करण्याच्या बदल्यात काही कोटी रुपयांची मागणी भावेश पटेल यांच्याकडे केली होती.

तेव्हापासून आकाश हा पोलिसांनी चकवा देत पळत होता. मागील सात महिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. 21 ऑगस्ट रोजी तो सातारा जिल्ह्यात असल्याची माहिती समजल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे, हवालदार सतीश कुदळे, विजय गाले, प्रवीण गेंगजे यांच्या पथकाने सापळा लावत आकाश साळुंखेला सातारा येथून अटक केली आहे.

आरोपीच्या वाहनांना पोलिस, आमदारचे स्टिकर

आकाश साळुंखे हा त्याच्या वाहनांना पोलिस तसेच आमदार असे वेगवेगळे स्टिकर लावून वाहने चालवत असे. त्याच्यावर सातारा व अन्य काही ठिकाणी अशाच प्रकारे फसवणूक केल्याच्या काही तक्रारी आहेत. तपासात अनेक प्रकार उघड होतील असे पोलिस दलाकडून सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news