Lonavala Garbage Depot: त्या’ ठेकेदाराला काळ्या यादीत टाका; वरसोली कचरा डेपो कथित कचरा चोरी

ठेकेदाराला कोणतेही बिल अदा करू नका; आरोग्य सभापती धनंजय काळोखे
Lonavala Garbage Depot
Lonavala Garbage DepotPudhari
Published on
Updated on

लोणावळा: वरसोली कचरा डेपो येथून जो कचरा चोरी होत आहे तो कोठे जात आहे. कोण चोरी करत आहे, कोणत्या खाणी भरण्यासाठी तो वापरला जात आहे. कचरा डेपोवर ठेकेदार योग्य प्रकारे काम करत नाही व कचराचोरी करून परस्पर विकला जात आहे.

असा काळा बाजार करणाऱ्या ठेकेदाराला एकही रुपया न देता त्याला काळया यादीत टाकावे व लोणावळा नगरपरिषदेचे जे नुकसान केले आहे त्याची नुकसान भरपाई त्याच्याकडून करून घ्यावी, अशी मागणी लोणावळा नगरपरिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती धनंजय काळोखे यांनी सभागृहात केली आहे. ठेकेदाराच्या या कारभारामुळे लोणावळा नगरपरिषद लोकप्रतिनिधी व प्रशासन हे सर्वच बदनाम होत आहे, असे त्यांनी सांगितले.

Lonavala Garbage Depot
Moshi Case Update: मोशी दुर्घटनेची राष्ट्रीय आयोगांकडून गंभीर दखल; PCMC आयुक्तांना नोटीस, १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

लोणावळा नगर परिषदेच्या वरसोली कचरा डेपोवर लोणावळा नगरपरिषद हद्दीबाहेरील कोणत्या ग्रामपंचायती व कोणकोणत्या हॉटेलचा कचरा येतो याची माहिती नगरसेवक मोबीन इनामदार यांनी प्रशासनाकडे मागितली होती.

कचरा डेपोच्या परिसरामध्ये असलेल्या तीन-चार ग्रामपंचायतीचा कचरा हा डेपोवर घेतला जातो असे यावेळी सांगण्यात आले.

मात्र, लोणावळा शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक हॉटेलचा कचरा या कचरा डेपोवर कसा येतो, कोणाच्या मान्यतेने येतो व त्याचा आर्थिक लाभ कोणाला भेटत आहे असे थेट सवाल इनामदार यांनी उपस्थित करत मागील कौन्सिलने काय केले ते माहित नाही आता नवीन कौन्सिल आहे हे सगळे प्रकार बंद झाले पाहिजेत अन्यथा यामध्ये जे जे सहभागी असेल त्यांना सोडणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

Lonavala Garbage Depot
Moshi News: वेस्ट टू एनर्जीच्या अनधिकृत इमारतीबाबत लपवाछपवी; माहिती देण्यास महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा नकार

नगरसेवक सुमित गवळी म्हणाले, कचरा डेपोवरून कचरा चोरी होतो की तेथील भंगार चोरी होते याची चौकशी प्रशासनाने करावी. लोणावळा नगरपरिषदेची लाखो रुपयांचे भंगार हे कचरा डेपोवर आहे.

नगरसेविका स्वप्ना कदम म्हणाल्या, कचरा डेपोवर नगर परिषदेचे कर्मचारी कार्यरत आहेत तसेच डेपो परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असताना कचरा चोरी होते कशी व ती होत असेल तर कॅमेरामध्ये टिपली गेली असेल त्यासाठी वेगळी चौकशी करण्याची आवश्यकता काय. प्रशासनाने तात्काळ याचा अहवाल सभागृहासमोर सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

वरसोली कचरा डेपोवरून कचरा चोरी होत असल्याची बाब आरोग्य समितीचे सभापती धनंजय काळोखे यांनी छायाचित्रासह प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. याबाबत त्यांनी तीन जुलै रोजी पत्र देखील दिली आहे. मात्र, या पत्रावर चौकशी सुरू असल्याचे उत्तर देत प्रशासनाने अद्याप पर्यंत याबाबतची माहिती दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news