Illegal Gas Refilling Raid: महाळुंगे एमआयडीसीतून ८१ सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई

या कारवाईत एक लाख ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Illegal Gas Refilling Raid
Illegal Gas Refilling RaidPudhari
Published on
Updated on

पिंपरी: घरगुती गॅस सिलिंडर वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात असताना उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गॅस रिफिलिंगचा प्रकार उघडकीस आला आहे.

गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने खराबवाडी येथे छापा टाकून तब्बल ८१ गॅस सिलिंडर जप्त केले. या कारवाईत एक लाख ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal Gas Refilling Raid
Pimpri CPCB Registration: पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या सोसायट्यांना CPCB नोंदणी बंधनकारक; नियम न पाळल्यास कारवाई

सचिन प्रकाश म्हस्करे (३१, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) याला अटक करून एका १६ वर्षीय विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय गणेश भारत गॅस कार्यालयासमोरील, हनुमान मंदिराच्या विरुद्ध बाजूस असलेल्या खराबवाडी परिसरात छापा टाकण्यात आला.

यावेळी आरोपी सचिन म्हस्करे आणि एका १६ वर्षीय विधी संघर्षित बालकाच्या ताब्यातून ८१ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या गॅस रिफिलिंग करून विक्रीसाठी हा साठा करून ठेवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ च्या कलम ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Illegal Gas Refilling Raid
PCMC Property Tax Collection: पिंपरी-चिंचवड महापालिकेची दमदार वसुली; 2 महिन्यांत 280 कोटी मालमत्ताकर जमा

घरगुती एलपीजी गॅस हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला जीवनावश्यक घटक मानला जातो. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा अवैध साठा करून त्याचे रिफिलिंग व विक्री केली जात असल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही भागांत नागरिकांना सिलिंडर मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात गॅसचा बेकायदा साठा करून त्याचा गैरवापर होत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.

अवैध गॅस रिफिलिंग हा केवळ आर्थिक गुन्हा नसून सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत गंभीर प्रकार मानला जातो. कोणतीही सुरक्षा यंत्रणा किंवा तांत्रिक मानके न पाळता सिलिंडरमधून गॅस भरला जात असल्यास गळती, आग अथवा स्फोटाचा धोका निर्माण होऊ शकतो. खराबवाडीसारख्या औद्योगिक आणि रहिवासी भागालगत अशा प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी केलेली ही कारवाई संभाव्य अनर्थ टाळणारी ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

यांनी केली कारवाई

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत आणि विनोद वीर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे तसेच पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश कोकणे, अमर कदम, विनोद वीर, गणेश सावंत आणि विशाल गायकवाड यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

"जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी, काळाबाजार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित अवैध व्यवसायांविरोधात गुन्हे शाखेच्या माध्यमातून सातत्याने कारवाया सुरू आहेत. अशा प्रकारे अवैध गॅस रिफिलिंग करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल."

संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news