IIM Pimpri Chinchwad Land | 'आयआयएम'साठी पिंपरी-चिंचवडमधील 70 एकर जागेस महसूलमंत्र्यांची मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महसूलमंत्र्यांची कार्यवाही
Indian Institutes of Management
Indian Institutes of Management Pudhari
Published on
Updated on

Pimpri Chinchwad IIM campus

मुंबई : महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. सुमारे 70 एकर जागेवर पिंपरी-चिंचवड शहरात आता " इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे,भारतीय व्यवस्थापन संस्था" (आय आय एम ) स्थापन केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोशी येथे आयआयएम कॅम्पससाठी जागा दिली आहे.

सध्या देशात २१ भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) कार्यरत आहेत. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. जिथे मुंबई व नागपूर अशा दोन आयआयएम आहेत. आयआयएम नागपूरची शाखा सुरू होत आहे. गेले वर्षभर यासाठी पाठपुरावा सुरू होता.

Indian Institutes of Management
PCMC Ward Structure: पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर

उद्योग नगरी, कामगार नगरी, आयटी हब आणि ऑटो हब अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यात देशातील व्यवस्थापन क्षेत्राची उच्चतम संस्था प्रारंभ करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस पूर्ण होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी पुणे, मुंबई व नागपुरात काही बैठकी घेतल्या. दरम्यान, महसूल मंत्री यांनी मोशी येथील 70 एकर जागेला मान्यता दिली आहे. 'आयआयएम' च्या कामाला आता गती मिळेल.

भूसंपादनाची प्रक्रिया प्रारंभ होत आल्याने आपण आनंदी आहोत, असे सांगून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, गणेश आगमनाचा उत्साह सुरू असतानाच शहरात आता आयआयएम सारखी नामांकित संस्था सुरू करण्याच्या कार्याचा खऱ्या अर्थाने ‘‘श्रीगणेशा’’ झाला आहे. पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर असून येथे देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. मुंबई-पुणे कनेक्टिव्हीटी, औद्योगिक विकास आणि शैक्षणिक वातावरण लक्षात घेता आयआयएमसारखी संस्था सुरू होणे, हे शहरासाठी अभिमानास्पद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news