

पिंपरी: हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळ्या उपयोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता हिंजवडी वाकड या पुलावरती दुचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. दुचाकी मुळे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यातून होणाऱ्या समस्या या कमी होण्यासाठी हा प्रयोग राबवण्यात आलेला आहे. (pimpari chinchwad news)
त्यानुसार सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये दुचाकी वाहनांना पुला वरती जाता येणार नाही. वाहतूक पोलिसांकडून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, माइक द्वारे तसेच स्वतः वाहतूक पोलीस उपस्थित राहून दुचाकी वाहनांना बाजूला करत आहे. यामुळे मोटार व इतर प्रवासी वाहनांना उड्डाणपूलावरती विना अडथळा जाता येऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे
याबाबत पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी सांगितले की , पहिल्याच दिवशी काही प्रमाणामध्ये दुचाकी नेहमीप्रमाणे पुलावरती जात होत्या. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आला आहे. मात्र दुचाकी चालकांकडून त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे निश्चितच वाहतूक कोंडी कमी होईल