

खराळवाडी: उद्योगनगरीतील नागरिकांना गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे. पूजेचे साहित्य, गणरायाची मूर्ती तसेच सजावटीचे साहित्य खरेदीसाठी पिंपरी बाजारपेठेत शहरवासीय गर्दी करत आहेत.
त्याचबरोबर माझा बाप्पा अधिक आकर्षक दिसावा यासाठी गणरायाच्या फेट्यांची क्रेज सध्या मार्केटमध्ये पाहण्यास मिळत आहे. मराठमोळा पेहराव करण्यासाठी गणेशभक्त गणरायाची मूर्तीनुसार कोल्हापुरी फेटा खरेदी करत आहेत. (Latest Pimpri News)
सध्या पिंपरी बाजारपेठेत फेट्यांना चांगली पसंती मिळत आहे. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत फेट्याच्या किमतीत वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरी देखील गणेशभक्तांनी फेटे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे.
कच्च्या मालाचे भाव वाढले
महागाईत वाढ झाल्याने कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत.त्याचा परिणाम खेरेदीसाठी येणार्या ग्राहकांवर होऊ नये यासाठी कमी साइचा फेटा दाखवून फेटा विक्री केला जात आहे, असे प्रसिद्ध फेट्याचे व्यापारी सांगतात.
फेट्यांचे प्रकार
फेट्याच्या दुकानात कोल्हापूरचा फेटा, सोलापुरी फेटा, राजस्थानी फेटा, पालखुणचा फेटा, पेशवाई फेटा, जरीचा फेटा, पैठणी फेटा, खनाचा फेटा असे विविध प्रकारचे फेटे खरेदीसाठी बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवलेले आहेत.
फेट्याचे भाव प्रति नगावर
कोल्हापूरी फेटा 100 ते 1000/-
राजस्थानी फेटा 200 ते 900/-
पेशवाई फेटा 50 ते 1000/-
पालखुणचा फेटा 300 ते 5000/-
सोलापूरी फेटा 100 ते 1000/-
साधा फेटा 50 ते 600/-