उन्हाच्या तडाख्यावर फळांच्या थंडाईचा दिलासा

टरबूज, कलिंगड, लिंबू, काकडी, कैरी खरेदीस ग्राहकांची पसंती
fruit
फळांच्या खरेदीस पसंतीpudhari
Published on
Updated on

पिंपरी : मोशी उपबाजारासह शहर आणि उपनगरातील मंडई तसेच फळांच्या विक्री केंद्रांवर रविवारी(दि.9) टरबूज, कलिंगड, लिंबू, काकडी, संत्री आणि पालेभाज्यांची आवक, खरेदी आणि किरकोळ विक्रीचे व्यवहार उत्साहात सुरू राहिले. शहर परिसरातील उन्हाच्या वाढत्या तडाख्यावर मात करण्यासाठी ग्राहकांनी फळांच्या खरेदीस पसंती देत थंडाईचा तडका दिल्याचे चित्र होते. मोशी उपबाजार समितीचे विभागप्रमुख नीलेश लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी बाजारात फळभाज्यांची आवक 4 हजार 204 क्विंटल तर फळांची आवक 578 क्विंटल झाली. पालेभाज्यांची आवक वाढली असून ती सुमारे 60 हजार गड्ड्या राहिली.

या मोसमातील कैरीची आवक सुरू झाली असून 300 किलो कैरी आवक झाली. कैरीचा भाव 4000 रुपये क्विंटल राहिला. लिंबाची आवक 47 क्विंटल झाली असून तोही 5000 रुपये होता. बटाट्याची आवक 798 क्विंटल, कांदा 302 क्विंटल तर त्यापाठोपाठ टोम’टोची आवक सर्वाधिक 627 क्विंटल झाली असून टोम’टोचा प्रति क्विंटल कमाल भाव एक हजार होता. लसूण आवक केवळ 600 किलो राहिल्याने लसूण प्रतिक्विंटल 15 हजार रुपये कमाल भाव होता.

मोशी उपबाजारातील शेतीमालाची आवक आणि कमाल दर प्रतिक्विंंटल याप्रमाणे:-

टोमॅटो- 627 क्विंटल, 1000 रु.

मटार- 408 क्विंटल, 4000 रु.

फ्लॉवर- 399 , क्विंटल, 700 रु.

कोबी- 308 क्विंटल, 800 रु.

कांदा- 302 क्विंटल, 2300 रु.

गाजर- 198 क्विंटल, 2000 रु.

वांगी- 155 क्विंटल, 4000 रु.

काकडी- 154 क्विंटल, 2000 रु.

मिरची- 125 क्विंटल, 4000 रु.

घेवडा 107 क्विंटल, 3000 रु.

भेंडी- 85 क्विंटल, 4000 रु.

ढोबळी- 78 क्विंटल, 3000 रु.

आले- 76 क्विंटल, 4000 रु.

दुधी भोपळा- 50 क्विंटल, 3000 रु.

लिंबू- 47 क्विंटल, 5000 रु.

मका कणीस- 45 क्विंटल, 1500 रु.

कारली- 41 क्विंटल, 4000 रु.

शेवगा- 31 क्विंटल, 5000 रु.

डांगर- 31 क्विंटल, 1000 रु.

पावटा- 26 क्विंटल, 5000 रु.

दोडका- 15 क्विंटल, 4000 रु.

वाल- 13 क्विंटल, 4000 रु.

घोसाळी- 5 क्विंटल, 3000 रु.

मोशी उपबाजारातील पालेभाज्यांची आवक

आणि प्रतिगड्डी कमाल भाव याप्रमाणे:-

कोथिंबीर- 31 हजार 850 गड्डी, 6 रु.

मेथी- 11 हजार 150 गड्डी, 8 रु.

पालक- 6 हजार 350 गड्डी, 8 रु.

पुदीना- 3 हजार गड्डी, 5 रु.

शेपू- 2 हजार 750, 8 रु.

कांदा पात- 2 हजार 200 गड्डी, 15 रु.

मुळा- 2 हजार 200 गड्डी, 20 रु.

हरभरा- 300 गड्डी, 7 रु.

एकूण 59 हजार 800 गड्डी

भाजीपाला आवक झाला.

पालेभाज्यांचे दर याप्रमाणे:-

कोथिंबीर- 10 रु.

मेथी- 10 रु.

पालक- 10 रु.

पुदीना- 10 रु.

शेपू- 10 रु.

कांदा पात- 20 रु.

मुळा- 20 रु.

हरभरा- 15 रु.

फळांचे किरकोळ विक्रीचे दर याप्रमाणे:-

सफरचंद- 160 ते 180 रु. ; हिरवी द्राक्षे 100 रु. काळी द्राक्षे 160 रु. ; संत्रा- 80 रु. मोसंबी- 80 रु. ; डाळिंब- 160 रु. ; पपई-50 रु. ; पेरु- 80 रु. बोरं- 100 रु. कोहळा नारळ- 50 ते 60 रु. केळी 40 ते 60 रुपये डझन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news