म्हाडाची घरे मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

समाजातील दलालांकडून सावध राहण्याचे आवाहन
Fraud
फसवणूकpudhari
Published on
Updated on

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास (म्हाडा) मंडळाची घरे नागरिकांना मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांकडून पैसे उकळण्यात आल्याची धक्कादाखल माहिती समोर आली आहे. याविरोधात भोसरी पोलिसांत अनेक तक्रारी दाखल झाल्याने समाजातील दलालांकडून सावध राहण्याचे आवाहन म्हाडा कार्यालयाच्या वतीने नुकतेच प्रसिध्दीपत्राद्वारे करण्यात आले.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास (म्हाडा) मंडळातर्फे ऑनलाईन पध्दतीने घरांची विक्री करण्यात येते, याबाबत वेळोवेळी जाहिरीद्वारे अर्ज विक्री करून सोडतीद्वारे घरांचे ऑनलाईन वाटप करण्यात येते. यासाठी कोणत्याही व्यक्तिला अथवा मध्यस्थीची नेमणूक करण्यात आली नाही. परस्पर अर्ज विक्री अथवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणारे व्यक्ति आढळल्यास त्याविरोधात जवळच्या पोलिसांत त्वरीत तक्रार दाखल करावी. तसेच म्हाडाच्या घरांबाबत माहितीसाठी www. mhada. gov. in d housing. mhada. gov. in या संकेतस्थळावर अथवा कार्यालयास भेट द्यावी.

प्रथम येणार्‍यास, प्रथम प्राधान्य या तत्तावर दिवे, सासवड, पिंपरी वाघेरे, महाळुंगे इंगळे व ताथवडे केवळ याच ठिकाणी असलेल्या घरांसाठी विपणन (मार्केटिंग एजन्सी) संस्थेची नेमणूक केली आहे. तरीदेखील त्यांच्याशी व्यवहार करताना मिळकत व्यवस्थापक, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्याकडून पडताळणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news