Garbage Problem: कचर्‍याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त; अलंकापुरम रस्त्यावरील स्थिती

परिसरात दुर्गंधी पसरत असून, अलंकापुरम भागातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत.
Pimpri News
कचर्‍याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त; अलंकापुरम रस्त्यावरील स्थिती Pudhari News
Published on
Updated on

चर्‍होली: अलंकापुरम रस्त्यावर छोट्या कचर्‍याच्या गाडीतील कचरा मोठ्या वाहनात टाकताना तो मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, अलंकापुरम भागातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत.

स्थानिक नागरिक त्रस्त

पुणे-नाशिक महामार्ग आणि पुणे-आळंदी पालखी मार्ग या दोन रस्त्यांना जोडणारा आणि चर्‍होली परिसरातून भोसरी, पिंपरी, चिंचवड या सर्व ठिकाणी जाण्याचा एक सर्वांत जवळचा मार्ग म्हणजे अलंकापुरम रोड. या रस्त्यावर अलंकापुरम नावाची मोठी सोसायटी असल्यामुळे या पूर्ण रस्त्यालाच अलंकापुरम रोड म्हणतात. हा रस्ता रुंदीला लहान आहे. मात्र, पुणे-नाशिक रोडला मिळण्यासाठी सर्वांत जवळचा रस्ता असल्यामुळे या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. (Latest Pimpri News)

रस्त्यावर पडतोय कचरा

चाकण औद्योगिक क्षेत्रातून रांजणगाव, कारेगाव, फुलगाव मरकळ, धानोरे या औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी मुख्यतः हा जवळचा रस्ता आहे. त्यामुळे अलंकापुरम रोडवर कायमच अवजड वाहनांची वाहतूक असते.

इतक्या गजबजलेल्या आणि मोठी वाहतूक असणार्‍या महत्त्वाच्या रस्त्यावर काही दिवसांपासून महापालिकेच्या लहान घंटागाड्यांतील कचरा मोठ्या गाड्यांमध्ये टाकला जात आहे. त्यासाठी अलंकापुरम रस्त्याच्या शेजारीच असणार्‍या 90 मीटर रस्त्यावर वाहने उभी केली जातात. हे सर्व करत असताना जास्तीचा कचरा या रस्त्यावरच पडलेला असतो.

उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

वार्‍यामुळे हा कचरा सर्वत्र पसरत असल्यामुळे आजूबाजूच्या सोसायटीमधील नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे कचरा कुजत आहे. तसेच, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

अलंकापुरम रस्ता अगदी शेजारीच असल्यामुळे या रस्त्याने जाणार्‍या येणार्‍या नागरिक आणि वाहनचालकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अलंकापुरम रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या इमारती आहेत. येथील शाळकरी मुलांना नाकाला रुमाल लावून शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर येथील समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

वडमुखवाडी-चर्‍होलीतील नागरिकांना मुख्यतः याच रस्त्याने प्रवास करावा लागतो. भोसरी, चिंचवड, पिंपरी या भागात जाण्याकरिता हा जवळचा रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावरील कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रहिवासी भागात कचरा आदान प्रदान करण्यापेक्षा यासाठी दूरच्या ठिकाणाचा वापर करावा.

- अ‍ॅड. कुणाल तापकीर, सामाजिक कार्यकर्ते, चर्‍होली

सध्या दिघीमधील कचरा संकलन केंद्र बंद आहे. दुसर्‍या ठिकाणी कचरा संकलन केंद्र सुरू होणार असून, तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अलंकापुरम रोडवर कचरा आदान-प्रदान व्यवस्था करण्यात येत आहे. एक-दोन दिवसांतच दुसर्‍या ठिकाणी कचर्‍याच्या ा प्रदानाची व्यवस्था केली जाईल.

- अमित पिसे, आरोग्य विभाग, ई क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news