शनिवारी वाकड, हिंजवडी, तळेगाव दाभाडे येथील वाहतुकीत बदल ; हे रस्ते आहेत बंद

वाहतूककोंडी होण्याची शक्यता
 वाहतुकीत बदल व पार्किंग स्थळ निश्चित
वाहतुकीत बदल व पार्किंग स्थळ निश्चितFile Photo
Published on: 
Updated on: 

मतमोजणीप्रक्रिया सुरू असताना वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 23) वाकड, हिंजवडी आणि तळेगाव दाभाडे व स्टेशन परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त बापू बांगर यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

वाकड वाहतूक विभागअंतर्गत येणार्‍या तापकीर चौक येथून थेरगावकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने काळेवाडी रोडने काळेवाडी फाटामार्गे इच्छित स्थळी जातील.

काळेवाडी पोलिस स्टेशन येथून तापकीर चौकाकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने काळेवाडी पोलिस स्टेशन येथून उजवीकडे वळून पाण्याची टाकीमार्गे इच्छित स्थळी जातील.

माध्यमिक विद्यालय थेरगावसमोरील चौकातून तापकीर चौकाकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने माध्यमिक विद्यालय थेरगांव समोरील चौकातून उजवीकडे वळून ‘ग’ प्रभागच्या रोडने इच्छित स्थळी जातील.

तापकीर चौक ते तापकीर मळा या दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत भाजप महायुती उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी व पार्किंग म्हणून राखीव राहील.

थेरगाव गावठाण येथे महाविकास आघाडी उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी व पार्किंग म्हणून राखीव राहील. पिंपरी-चिंचवड मनपा कामगार भवन थेरगाव समोरील पीएमपीएमएल बससाठी असलेले ‘डी’ मार्टच्या बाजूचे पार्किंग हे इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी व पार्किंग म्हणून राखीव राहील.

गोदरेज सर्कल, म्हाळुंगे गाव ते राधा चौक व राधा चौक ते म्हाळुंगे गाव ते गोदरेज सर्कल हा रस्ता जड व अवजड वाहनांसाठी बंद राहील. चांदेनांदे येथून येणारी जड अवजड वाहने गोदरेज सर्कल येथून डावीकडे वळून माण व हिंजवडीमार्गे इच्छित स्थळी जातील.

बाणेररोड व राष्ट्रीय महामार्गावरुन येणारी जड-अवजड वाहने राधा चौकातून उजवीकडे वळून वाकड नाकामार्गे हिंजवडी व इच्छित स्थळी जातील.

बालेवाडी स्टेडियम मेनगेट समोरील रस्ता उत्तम स्विट (पुणेरी स्विट) चौक ते म्हाळुंगे पोलिस चौकीपर्यंत वाहतूकीसाठी बंद राहील. गोदरेज सर्कल व म्हाळुंगे गावातून येणारी हलकी वाहने उत्तम स्विट (पुणेरी स्विट) चौक येथून उजवीकडे वळून म्हाळुंगे पोलिस चौकीपासुन पुढे मुख्य रस्त्याने राधाचौक येथून इच्छित स्थळी जातील. तसेच, राधा चौकातून येणारी हलकी वाहने म्हाळुंगे पोलिस चौकीजवळ डावीकडे वळुन पुढे उत्तम स्विट (पुणेरी स्विट) जवळ डावीकडे वळून पुढे म्हाळुंगे गाव, गोदरेज सर्कल चौक येथून इच्छित स्थळी जातील.

महाविकास आघाडीसाठी जागा

महाविकास आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी राधा हॉटेलच्या मोकळ्या जागेमध्ये व न्याती शोरूम ते पॅरादी हवेली अंडरपास दरम्यानचे सर्विस रोडवर वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, म्हाळुंगे पोलिस चौकी ते बालेवाडी स्टेडियम मेनगेट दरम्यानच्या रोडवर कार्यकर्त्यांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

महायुतीसाठी जागा

ऑर्किड हॉटेल हायवे गेट ते मुळा नदी ब्रिजपर्यंत सर्विस रस्ता वाहतुकीकरिता बंद ठेवण्यात येत असून राजवाडा गेट ते मुळा नदी ब्रिजपर्यंत सर्विस रोडवर महायुती पक्षाचे कार्यकर्त्यांचे वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, राजवाडा गेट ते मुळा नदी ब्रिज दरम्यानच्या सर्व्हस रोडवर कार्यकर्त्यांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

अन्य पक्षासाठी जागा

अन्य पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते यांचेसाठी नामदेवराव मोहोळ माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे या शाळेमध्ये वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, उत्तम स्वीट चौक ते बालेवाडी स्टेडियम मेनगेट दरम्यानच्या रोडवर कार्यकर्त्यांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

तळेगाव वाहतूक विभाग अंतर्गत-

मुंबईकडून तळेगाव चाकणरोडने एचपी चौकाकडे जाणार्‍या जड व अवजड वाहतुकीस प्रवेशबंदी करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने वडगाव फाटा एमआयडीसी रोडमार्गे वडगाव कमान (डावीकडे वळून) तळेगाव नवलाख उंब्रे बधलवाडी भामचंद्र डोंगर आंबेठाण एचपी चौकमार्गे इच्छीत स्थळी जातील. मुंबईकडून चाकणच्या दिशेने जाणार्‍या हलक्या वाहनांना व दुचाकीस वडगाव फाटा ते इंद्रायणी कॉलेजपर्यंतचे मार्गावर बंदी करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने वडगाव फाटा निलया सोसायटी कार्नर (डावीकडे वळून) मंत्रा सिटीरोडमार्गे बीएसएनएल कॉर्नर (उजवीकडे वळून) सीटी कार्नर (डावीकडे वळून) हिंदमाता भुयारी मार्ग येथे उजवीकडे वळून चाकण बाजूकडे जातील. काका हलवाई स्वीट मार्ट/ शांताई जनसेवा वाचनालय इंद्रायणी कॉलेज

चाकण एचपी चौकाकडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या जड व अवजड वाहतुकीस चाकण तळेगाव रोडवर बंदी करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने एचपी चौक आंबेठाण भामचंद्र डोंगर नवलाख उंब्रे तळेगाव एमआयडीसीमार्गे इच्छीत स्थळी जातील.

बधलवाडी चाकण कडून मुंबईच्या दिशेने जाणा-या हलक्या वाहनांना व दुचाकींना इंद्रायणी कॉलेज तळेगाव ते वडगाव फाटया पर्यंतच्या रोडवर बंदी करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने जनसेवा वाचनालय इंद्रायणी कॉलेज येथे (डावीकडे वळून) हिंदमाता भुयारी मार्ग शांताई सीटी कार्नर (उजवीकडे वळून) बीएसएनएल कॉर्नर (डावीकडे वळून) मंत्रासिटी रोडमार्गे इच्छीत स्थळी जातील.

अपक्ष उमेदवारांसाठी येथे पार्किंग

इतर अपक्ष उमेदवार यांच्या कार्यकर्त्याकरिता दुय्यम निबंधक कार्यालयासमोरील अंतर्गत रोडलगत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाजवळील मोकळ्या जागेत व्यवस्था करण्यात आली आहे

महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी पार्किंग

मतमोजणीच्या दिवशी महायुतीचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांना वडगाव फाटा ते स्वराज नगरीमार्गे येऊन माउंट सेंट अ‍ॅन स्कूल तळेगाव चाकणरोड तळेगाव या शाळेच्या पार्किंगमध्ये थांबण्याची व मैदानामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

बापूसाहेब भेगडे यांच्या कार्यकर्त्यांसाठी पार्किंग

मतमोजणीच्या दिवशी अपक्ष उमेदवार बापुसाहेब जयवंतराव भेगडे व त्यांचे कार्यकर्ते तळेगाव स्टेशन चौकातून हरणेश्वर सोसायटी मार्गे येऊन वाघळे पार्क, हरणेश्वर सोसायटी, येथील अंतर्गतरोडलगत तसेच भारत पेट्रोलपंप ते ईगल कार्नरपर्यंत सर्व्हिस रोडवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कार्यकर्त्यांना थांबण्याकरिता नूतन पॉलेटेक्निल कॉलेजच्या कमानीचे उजव्या बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news