पिंपरी: गेल्या दोन दिवसांपासून शालेय प्रवेश व सरकारी योजनांसाठी आवश्यक असणारे विविध दाखले मिळणे दुरापास्त झाले आहे. दाखल्यांचे ऑनलाईन सेवा आणि पोर्टलला तांत्रिक अडचण येत आहे. परिणामी, हजारो दाखले अडकून पडले आहेत. दुसरीकडे, अनेक हेलपाटे मारुनही दाखले मिळत नसल्योच अर्जदारांमध्ये नाराजी आहे.
तहसील कार्यालयाकडून विविध 13 प्रकाराचे दाखले देण्यात येतात. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राज्य शासनाचे दाखल्याचे संकेतस्थळ आणि पोर्टल हे कार्यान्वित होत नाही. त्यामुळे अर्जदारांचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. रात्री दहानंतर हे संकेतस्थळ अॅक्टिव्ह होत असल्याने उशिरापर्यंत सेतू कर्मचार्यांना बसून राहावे लागते. (Latest Pimpri News)
गेल्या महिन्यात तब्बल दहा दिवस सेतू कार्यालय हे संकेतस्थळाचे अद्यायवतीकरण आणि दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले हेाते. तेव्हा साडेचार हजार अर्ज प्रलंबित होते. त्यातनंतर आता पुन्हा तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे अर्जदारांना खाली हात परतावे लागते.
सेतू कार्यालय व्यवस्थापन करार संपुष्टात
पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयात असलेल्या सेतू कार्यालयात गुजरात इन्फोटेक या कंपनीला चालवण्यासाठी करार केला होता. तो संपल्यानंतर तात्पुरते मुदतवाढ देण्यात आली होती. आत तीदेखील संपली आहे. त्यामुळे आता नेमके हे कार्यालया कोण चालवणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दाखल्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच, संबंधित सेतू कार्यालयातील कर्मचार्यांनादेखील उशिरा थांबून दाखल्याबाबत सूचना केल्या आहेत. लवकरच ही समस्या दूर होईल.
मनीषा लोंढे, नायब तहसीलदार, पिंपरी चिंचवड