Assembly Election | चिंचवडमध्ये भाजपच्याच विजयाची बॅनरबाजी

एकनिष्ठ पक्षाचा निर्धार विजयाचा; विजय शिंदेंच्या बॅनरची चर्चा
BJP assembly elections
चिंचवडमध्ये भाजपच्याच विजयाची बॅनरबाजीFile Photo
Published on
Updated on

पिंपरी : शहरातील सर्वाधिक मोठा मतदारसंघ असणाऱ्या चिंचवड मतदारसंघात भाजपचे निष्ठावान असणारे नगरसेवक शीतल ऊर्फ विजय शिंदे यांनी लावलेल्या एकनिष्ठ पक्षाचा निर्धार विजयाचा... होर्डिंगची शहरात नव्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Assembly Election)

भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या चिंचवडमध्ये भाजपचाच विजय या वाक्याने चिंचवड विधानसभेत भाजप आरएसएसच्या कुशीतील कार्यकर्त्याला संधी देणार का? अशा चर्चाना वेग आला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदारासह, शहराध्यक्ष, माजी नगरसेवक आणि भाजपमधील विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व इच्छुक आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात २०१४ पासून सलग तीन आमदार निवडून येत अबाधितपणे भाजपचे कमळ फुलले आहे. घराणेशाहीला भाजपच्या अनेक नगरसेवकांनी विरोध केला आहे. दहा ते पंधरा नगरसेवकांचा वेगळा गट तयार होऊन प्रसंगी बंडाच्या पवित्र्यात आहे.

अशातच शीतल ऊर्फ विजय शिंदे यांच्या पलेक्सबाजीमुळे चर्चेला उधाण आले आहे. चिंचवड विधानभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव आहे. भाजपला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याने विधानसभा निवडणुकीत संघाच्या विचारांचा आमदार चिंचवडसाठी हवा आहे, अशा चर्चांनी जोर धरला आहे.

विद्यमान आमदारसह शहराध्यक्ष व अनेक माजी नगरसेवकांनी उमेदवारी मागितली आहे. सध्या ज्यांचा आमदार त्या पक्षाला या ठिकाणी जागा मिळणार असल्याने चिंचवडमध्ये महायुतीचा उमेदवार भाजपचाच असणार आहे.

सर्व इच्छुकांमधील पार्श्वभूमी पाहता चिंचवड विधानसभेसाठी भाजपच्या कुशीत तयार झालेला उमेदवार देईल आणि तो सर्व इच्छुकांना मान्य करावा लागणार आहे. भाजपकडून आरएसएसच्या कुशीतील कार्यकर्त्याला उमेदवारी देऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news