Dengue And Chikungunya | डेंग्यू की चिकुनगुनिया? डॉक्टरांचा उडतोय गोंधळ

डेंग्युबरोबरच सध्या शहरभर चिकुनगुनियाची साथ सुरु आहे.
Dengue And Chikungunya
Dengue And ChikungunyaFile Photo
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

डेंग्युबरोबरच सध्या शहरभर चिकुनगुनियाची साथ सुरु आहे. या दोन्ही आजारांच्या लक्षणांमध्ये साधर्म्य असल्याने रुग्णाला डेंग्युची की चिकुनगुनियाची लागण झाली आहे, याचे निदान करताना डॉक्टरांचा गोंधळ उडत आहे.

चिकुनगुनियाच्या विषाणूंचा नवीन प्रकार आढळल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी मांडले आहे. मात्र, त्याबाबत शासनाकडून काही मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. चिकुनगुनियाच्या बदलत्या लक्षणांनंतर होणाऱ्या वेदनादायी त्रासामुळे रुग्णांना किमीन दोन आठवडे चालणे-फिरणे कठीण होत आहे.

विषाणूंच्या नव्या प्रकाराबाबत तातडीने मार्गदर्शन करण्याची मागणी पुण्यातील संसर्गजन्य रोगतज्ज्ञांनी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) केली आहे. चिकुनगुनिया रुग्णांमध्ये अर्धांगवायूची लक्षणे आढळत असल्याचे निरीक्षण पुण्यातील काही संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉक्टरांनी नोंदवले आहे.

मात्र, पिंपरी- चिंचवडमध्ये अशी लक्षणे आढळली नसल्याची माहिती महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. दरम्यान, शहरामध्ये शुक्रवार अखेर चिकुनगुनियाचे एकूण २७ बाधित रुग्ण आढळून आलेत. रुग्णांच्या फुफ्फुसात आणि पोटात पाणी होण्यासारखी गुंतागुंत निर्माण होत आहे. ही डेंग्युची लक्षणे आता चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्येही आढळू लागली आहेत. उलट्या होणे आणि गॅस्ट्रो लक्षणांच्या रुग्णांना देखील चिकुनगुनिया झाल्याचे आढळत आहे.

प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होणे, हे चिकुनगुनियामध्ये कधीही न आढळलेले लक्षण देखील सध्या पाहण्यास मिळत आहे. चिकुनगुनियाचा व्हायरस सतत नवनवी लक्षणे दाखवत आहेत. त्यामुळे रुग्णाला डेंग्युची लागण झाली आहे की चिकुनगुनियाची, याचे निदान करताना डॉक्टरांचा गोंधळ उडत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news