Ajit Pawar: आयटी हब परिसरातील अजित पवारांकडून पाहणी
पिंपरी: गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत राहिलेल्या हिंजवडी म्हणजेच आयटी हब परिसरातील तब्बल बारा ठिकाणांची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
चुकीची कामे, अनधिकृत बांधकाम, बुजवलेली नाले या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तर, वेळे प्रसंगी कामाला विरोध करणाऱ्यावर फौजदारी दाखल करा असे निर्देश दिले आहेत. याची दखल घेत पीएमआरडीए प्रशासनाने गुरुवारपासून मोहिम हाती घेतली आहे. (Latest Pune News)
हिंजवडीमध्ये अनेक विकास काम सुरू आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ता करण्यात येत आहे. विप्रो कंपनीच्या शेजारी रस्त्यावरून अजित पवारांनी थेट रस्ता अडवणाऱ्याला इशारा दिला.
दरम्यान, स्थानिक ग्रामपंचायत विभागाला देखील धारेवर धरले. या पाहणी नंतर पी एम आर डी ए कार्यालयात बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या. त्यानुसार या विरोधात विशेष मोहीम आखली गेली असून, गुरुवारापासून प्रत्यक्ष कारवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अडवलेले नाले, रस्त्याला अडथळे आणणारे बांधकामे हाटवली जाणार आहेत

