Noise Pollution | दोन गणेश मंडळांविरोधात गुन्हे दाखल

गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाज वाढविल्याने पोलिसांकडून कारवाई
दोन गणेश मंडळांविरोधात गुन्हे दाखल
दोन गणेश मंडळांविरोधात गुन्हे दाखलFile Photo
Published on
Updated on

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत निर्धारित मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांकडून बालाजीनगर परिसरातील दोन मंडळांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

(Noise Pollution)

अखिल गुरुदत्त तरुण मित्रमंडळ आणि शिवतीर्थ मंडळाचे अध्यक्ष, डीजे चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस कर्मचारी बबलू भिसे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात अखिल गुरुदत्त तरुण मित्रमंडळ, शिवतीर्थ मंडळ आहे. १७ सप्टेंबर रोजी दोन्ही मंडळांकडून मिरवणूक काढण्यात आली.

दोन्ही मंडळांनी कोणतीही दिलेल्या परवानगी घेतली नव्हती. तसेच ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडल्याने रहिवाशांना त्रास झाल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी याबाबत दोन्ही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. याप्रकरणी दोन्ही मंडळांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news