Pimpri News: मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तिळगुळाचा गोडवा वाढवत स्नेहीजनांच्या गप्पांची रंगलेली मैफल... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात दैनिक पुढारीचा 86 वा वर्धापन दिन मंगळवारी (दि. 14) उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने जमलेल्या स्नेहीजनांमध्ये मैत्रीचे बंध अधिक घट्ट झाले.
निर्भीड पत्रकारितेद्वारे एक नवा मापदंड प्रस्थापित करणार्या दैनिक पुढारीने मोठ्या दिमाखात 87 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त काळेवाडी येथील रागा पॅलेसमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमानिमित्त येथे आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई केली होती. रंगावलीकार अनिता रोकडे यांनी चितारलेली आकर्षक रांगोळी लक्ष वेधून घेत होती.
या मेळाव्याला पुढारीवर प्रेम करणार्या वाचकांपासून राजकारण, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. त्यामुळे वाचकांशी दैनिक पुढारीचे जडलेले नाते प्रकर्षाने अधोरेखित झाले. पिंपरी-चिंचवड आणि मावळ येथील असंख्य वाचकांनी स्नेहमेळाव्यात अलोट गर्दी केली होती. दैनिक पुढारी वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी मान्यवरांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, कृषी, सहकार, बांधकाम, व्यापार, पोलिस, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दैनिक पुढारीला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, केशव घोळवे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, पोलिस अपर आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त बापू बांगर, भाजपाचे शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाच्या महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, युवा नेते सचिन निंबाळकर, राष्ट्रवादी काँगे—स पार्टी वाहतूक सेलचे शहराध्यक्ष विनोद वरखडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर संघटक संतोष सौंदणकर, शिवसेना शिवशक्ती वाहतूक सेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख वैभव छाजेड, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अनिकेत प्रभू, आम आदमी पार्टी पक्षाचे शहराध्यक्षा मीना जावळे, युवक शहराध्यक्ष रविराज काळे उपस्थित होते.
त्यासोबतच यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, संजय कुलकर्णी, उपायुक्त विठ्ठल जोशी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता विजय भोजने, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, निवृत्त सहआयुक्त दिलीप गावडे, निवृत्त कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, पीएमआरडीएचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर भाले, एच. ए. मजदूर संघाचे सेक्रेटरी विजय पाटील, कामगार नेते इरफान सय्यद, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, कामगार नेते काशिनाथ नखाते, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अविनाश वाचासुंदर, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, स्वीकृत संचालक विजय भिलवडे, उद्योजक रामदास जैद, गोविंद पानसरे, पिंपरी-चिंचवड जैन महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. अशोककुमार पगारिया, भाजपा जैन प्रकोष्टचे शहर संयोजक संदेश गादिया, भारतीय जैन संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शुभम कटारिया, पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गौरव वाळुंज, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलचे प्राचार्य विक्रम काळे, पर्यवेक्षक शशिकांत हुले, बामसेफचे शैलेश शिंदे, संजय चव्हाण, राकेश रंधवे, करण कदम, दिलीप धबडगे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, साहित्यिक राजेंद्र घावटे, सुरेश कंक आदी उपस्थित होते.
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे पदाधिकारी, विश्वस्त, विभागप्रमुख व वृत्तपत्र विक्रेते आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी दैनिक पुढारीचे संचालक मंदार पाटील उपस्थित होते.