Pimpri Bribe News: घरगुती वीजकनेक्शन मंजुरीसाठी 25 हजारांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडले

भोसरी येथील महावितरण कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
Pimpri Bribe News
घरगुती वीजकनेक्शन मंजुरीसाठी 25 हजारांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडलेPudhari
Published on
Updated on

पिंपरी: घरगुती वीजकनेक्शन मंजूर करून देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गुरुवारी (दि. 5) स्पाईन सिटी, भोसरी येथील महावितरण कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे (वय 34) आणि खासगी इसम श्यामलाल असोकन (34, रा. बोराटेवाडी, मोशी) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका सरकारी विद्युत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. (Latest Pimpri News)

Pimpri Bribe News
Pimpri: गृहप्रकल्पात सोलरद्वारे विजेची 30 टक्के बचत; जिल्ह्यातील पहिला प्रकल्प असल्याचा पीएमआरडीएचा दावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महावितरणच्या मंजुरीसाठी लायझनिंग व कनेक्शनची प्रक्रिया हाताळणारे शासकीय ठेकेदार आहेत. दरम्यान, 4 जून रोजी त्यांनी एका ग्राहकाच्या घरगुती वीज कनेक्शनसाठी भोसरी येथील महावितरण कार्यालयात अर्ज केला होता.

संबंधित अर्जाची फाईल सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांच्याकडे कार्यवाहीसाठी आली होती. त्यांनी कनेक्शन मंजूर करुन देण्यासाठी 35 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम 25 हजार रुपये ठरली. त्यानंतर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

Pimpri Bribe News
Pimpri Weather Changes: तापमानात चढ-उतार! शहरवासीयांना सर्दी, खोकला, ताप; बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम

या तक्रारीच्या आधारे पथकाने गुरुवारी (दि. 5) सापळा रचून महावितरण कार्यालयात ही कारवाई केली. नरवडे व त्यांचा साथीदार असोकन हे दोघेही 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news