Crime Case | उद्योगनगरीतही 'ती' असुरक्षित

आठ महिन्यांत 163 बलात्काराच्या घटना
Crime Case
Crime CaseFile Photo
Published on
Updated on

पिंपरी : कोंढवा येथील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यातील आरोपींचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर 'पुढारी' ने उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील स्त्री अत्याचाराच्या घटनांचा आढावा घेतला असता, मागील आठ महिन्यांत तब्बल १६३ महिलांवर बलात्कार झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे.

दरम्यान, पोलिसांनी या सर्व घटना गांभीर्याने घेत गुन्ह्यांची उकल करून संबंधित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी सन २०१८ मध्ये पोलिस आयुक्तालयाची स्थापना केली. स्थापनेनंतर घरफोडी, वाहनचोरी, हाणामारी, दरोडा, खून अशा अनेक प्रकारच्या गुन्हांना आळा बसला.

गुन्ह्यांची संख्या कमी झाली. दरम्यान, गुन्हेगारी टोळ्यांना संपविण्यासाठी पोलिस आयुक्तांनी शेकडो टोळ्यांवर मोक्का कारवाई केली. त्यामुळे शहरातील टोळ्यांनीही नांगी टाकली आहे. एकीकडे या प्रकारची गुन्हेगारी कमी होत असली तरी,

अद्यापही शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसाच आहे. ओळखीचे लोक, नातेवाईक, मित्र, प्रियकर यांच्याकडून महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. लग्नाच्या अमिषाने, प्रेमाच्या जाळ्यात ओढून तसेच ब्लॅकमेल करून महिलेवर बलात्कार केला जातो.

मागील आठ महिन्यांत या प्रकारच्या १६३ घटना घडल्या आहे. पोलिसांनी या सर्व गुन्ह्यांतील आरोपींना अटक केली आहे. तांत्रिक गुन्ह्यांमुळे आकड्यांना सूज पोलिस आयुक्तालय परिसरात घडणाऱ्या लैंगिक अत्याचार गुन्ह्यांतील ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुन्हे तांत्रिक स्वरूपाचे आहेत.

काही वर्षांपूवी आलेले शारीरिक संबंध, प्रेमसंबंधातून आलेले शारीरिक संबंध, लग्नास नकार दिल्याने प्रियकराबरोबर पळून गेल्यानंतर घरच्यांनी सांगितले म्हणून दिलेली तक्रार. तसेच, जाणीवपूर्वक दिलेली तक्रार, यासारख्या गुन्ह्यांना तांत्रिक गुन्हे म्हणतात. शहरात सध्या या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे.

वृद्ध महिलेवर अत्याचार प्रकरणाने हळहळ

शहरातील म्हाळुंगे परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीतील ८५ वर्षीय महिलेवर इलेक्ट्रिशनचे काम करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने बलात्कार केला. आरोपीने या वृद्ध महिलेला तिच्या फ्लॅट समोरून ओढून नेत तिचे तोंड दाबून आणि मारहाण करत बलात्कार केला. पोलिसांनी घटनेच्या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या; मात्र या घटनेने संपूर्ण शहर हळहळले.

चिमुकल्यांवर वाईट नजर

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत जानेवारी ते २० ऑगस्ट २०२४ या आठ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ७८ चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. तर, ६६ अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आल्याची नोंद आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे या पैकी बहुतांश गुन्ह्यांतील आरोपी हे पीडित चिमुकल्यांचे नातेवाईक तसेच ओळखीचेच आहेत.

महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची तात्काळ उकल करून संबंधित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. महिला अत्याचार गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. महिलांनीदेखील लग्नाच्या आमिषाला बळी पडू नये.

संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news