दरम्यान विरोधी पक्षांना फोडण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपने सुरु केला असल्याची टीका राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी केली आहे. 'पहिल्यांदा भ्रष्ट नेत्यांना लक्ष्य करायचे, त्यांच्यामागे तपास संस्था सोडायच्या आणि नंतर त्यांना स्वीकारायचे व त्यांचा पाठिंबा घ्यायचा' ही भाजपची नीती महाराष्ट्रातील घडामोडीद्वारे पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे, असे सिब्बल यांनी सांगितले.