petrol hike : दिवाळी बेतात करून खिसा गरम ठेवा ! पेट्रोल १५० रुपयांवर जाण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत पुढील वर्षभरात ११० डॉलर प्रती बॅरल पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. वर्ष अखेर पर्यंत कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर पर्यंत पोहचेल असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे. पंरतु,अभ्यासकांनी वर्तवलेल्या भाकितांप्रमाणे कच्च्या तेलाच्या किंमतीत संभाव ३०% वाढ झाली तर, भारतात पेट्रोल (petrol hike) १५० रूपये लीटर आणि डिझेल १४० रूपये प्रती लीटर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीचा मोठ्या फटका त्यामुळे भारतीयांना येत्या काळात सहन करावा लागणार असल्याचे आडाखा यानिमित्ताने बांधले जात आहे.

२०२२ मध्ये तेलांच्या किंमती अधिक वाढण्याची शक्यता

कच्च्या तेलाची मागणी कोरोना महारोगराईनंतर पुर्वपदावर आली आहे. अशात २०२२ मध्ये तेलांच्या किंमती अधिक वाढण्याची शक्यता आहे. देशात सध्या पेट्रोल (petrol hike) ११३ रूपये आणि डिझेल १०४ रूपये लीटर दराने विकले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर ९९ डॉलर प्रती बॅरल असून लवकरच ते १०० डॉलर पर्यंत पोहचतील असा अंदाज आहे.

जून २०१४ मध्ये तेल विपणन कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल डीलर ला ४९ रूपये लीटर प्रमाणे पेट्रोल पुरवत होती. डीलर कमिशन, केंद्र व राज्य सरकारचा कर असे एकूण ३४% कर आकारणी करून पेट्रोलची ७४ रूपये लीटर दराने विक्री केली जात होती.

तर सध्यस्थितित पेट्रोलचे दर ६६ रूपये लीटर वर येतील

ऑक्टोबर २०२१ मध्ये तेल विपणन कंपन्यांनी रिटेल किंमत ४२ टक्क्यांची घटवली. पंरतु, कर आणि डिलर कमीशन वाढवून ५८% करण्यात आले. केंद्र सरकार २०१४ मध्ये रिटेल प्राईस वर १४% कर आकारायची. २०२१ मध्ये हा कर ३२ टक्क्यांपर्यंत पोहचला. राज्य सरकारचा कर देखील या दरम्यान १७ वरून २३ टक्क्यांपर्यंत पोहचला. डिझेलची किमत २०१४ मध्ये डिलर कमीशन आणि सरकारी कर वगळता ४५ रूपये होती. पंरतु, २०१४ मध्ये केंद्र सरकार कडून उत्पादन शुल्क कर यात ८% आकारला जायचा. २०२१ मध्ये तो वाढून ३५% झाला. राज्य सरकारचा व्हॅट या दरम्यान १२ ने वाढून १५ टक्के झाला.

२०१४ प्रमाणे सरकारने कर लावले, तर सध्यस्थितित पेट्रोलचे (petrol hike) दर ६६ रूपये लीटर वर येतील. तर, डिझेलचे दर ५५ रूपये लीटर प्रमाणे आले असते. आकडेवारीनूसार २०१५ मध्ये डीलर कमीशन आणि सरकारी कर वगळता पेट्रोलची किंमत २९ रूपये लीटर होती. तर, २०१६ मध्ये ती २८ रूपये पर्यंत पोहचली. २०१७ मध्ये ही किंमती ३० रूपये आणि २०१८ मध्ये ४३ रूपये लीटर पर्यंत पोहचली. २०१९ आणि २०२० मध्ये ही किंमत अनुक्रमे ३४ रूपये आणि २६ रूपयांपर्यंत पोहचली. तर २०२१ मध्ये ही किंमत ४२ रूपये करण्यात आली. २०१४ च्या तुलनेत आता देखील तेल विपणण कंपन्या कमी किंमतीवर पेट्रोल ची विक्री करीत आहेत. पंरतु, सरकारच्या करांमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news