

पुढारी ऑनलाईन : सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे एखादी गोष्ट कधी कशी व्हायरल होईल त्याचा काही नेम नाही. असाच एक अफलातून आणि धोकादायक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये शेकडो लोक हे एका रेल्वेच्या छतावर बसून प्रवास करत आहेत. हा व्हिडिओ बांग्लादेशातील बिलासपूरचा असल्याच बोललं जात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर काही लोकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे, तर काही लोकांकडून या व्हिडिओवर मजेदार कमेंटही येत आहेत.
तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. या रेल्वेच्या छतावर इतके लोक बसले आहेत की, रेल्वेच दिसेनाशी झाली आहे. काही लोकांच्या मते ही तर छैंय्या… छैंया ची धोकादायक आवृत्ती आहे. मात्र या इतक्या सर्व लोकांमध्ये लक्ष वेधून घेतले ते एका चाच्यांनी. त्यांनी प्रवासासाठी जागाही तशीच निवडली. हे चाचा गर्दीपासून दूर शेवटच्या डब्याच्या पाठीमागे एका छोट्या जागेत निवांत बसलेत. तेथे ना गर्दी ना कोण सरक म्हणण्याची भीती. ते आपले निवांत एकटे बसून रस्त्यावर पळणारी उलटी झाडे पाहत प्रवासाची मजा घेत आहेत.
हा व्हिडिओ एका ट्विटर यूजरने ६ ऑक्टोबर रोजी शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिलंय की, हा फक्त खुळेपणा आहे. अशी घटना पहिल्यांदाच काही घडलेली नाही. या आधीही बांग्लादेशमधून अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आले आहेत. मात्र लोकांची या प्रकारे प्रवास करण्याची पद्धत बधितली की या लोकांना इतक्या गडबडीने कोठे जायचे आहे हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
हेही वाचा :