

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज जे भाजपसोबत आहेत त्यांच्यासोबत जनता नाही. देशातील अनेक राज्यामध्ये भाजपची सत्ता नाही. देशात भाजविरोधात वातावरण आहे, असा दावा करत खरी राष्ट्रवादी कोणाची हे जनतेला माहित आहे, असे टाेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज ( दि. 15 ) राष्ट्रवादी अजित पवार गटाला टाेला लगावला. मुंबई येथे आयाेजित सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बाेलत हाेते.
या वेळी शरद पवार म्हणाले की, "काही लोक पक्षावर दावा करत न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे खऱ्या राष्ट्रवादीवर आता न्यायालयात संघर्ष करण्याची वेळ आली आहे. आता हे लोक निवडणूक आयोगात पक्ष, चिन्हावर दावा करत आहेत; पण खरी राष्ट्रवादी कोणाची हे जनतेला माहित आहे."
राज्य सरकारने कंत्राटी पोलीस भरतीचा निर्णय घेतला आहे. पाेलीस खात्यामध्ये सर्व जातींना व महिलांना प्रतिनिधित्व मिळायला हवे. मात्र कंत्राटी भरतीमुळे सरकार या उद्देशाच हारताळ फासत आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीची पोलीस भरती चुकीची आहे असेही पवार यावेळी म्हणाले.