

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात जुलै महिन्यापासून पावसाची संततधार सुरु आहे. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. आज (दि. १ ऑगस्ट) मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून पुन्हा काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिलेला आहे.
मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला नाही.