Omicron variant xbb 1.16
Latest
Omicron variant xbb 1.16 : देशातील ओमिक्रॉनच्या एक्सबीबी.1.16 सब व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत वाढ; जागतिक आरोग्य संघटना
पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 3, देशातील ओमिक्रॉनच्या एक्सबीबी.1.16 Omicron variant xbb 1.16 सब व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा हा ताजा सब व्हेरिएंट आहे. ज्या सहा सब व्हेरिएंटवर जागतिक आरोग्य संघटनेचे लक्ष आहे, त्यात एक्सबीबी.1.16 सब व्हेरिएंट सामील आहे. त्यामुळे भारताच्या चिंतेत भर पडणार आहे.
जगभरात कोरोनाचे रुग्ण आणि संक्रमण कमी होत असले तरी भारतासह काही मोजक्या देशात कोरोना वाढत असल्याचे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या साप्ताहिक अहवालात नोंदविले आहे. भारतात इतर सब व्हेरिएंटची जागा एक्सबीबी.1.16 सब व्हेरिएंटOmicron variant xbb 1.16 घेत असल्याचे कोविड – 19 टेक्निकल लीड विभागाच्या प्रमुख मारिया केरखोव्ह यांनी सांगितले. एक्सबीबी.1.16 सब व्हेरिएंटच्या 800 सिक्वेन्सिंगपैकी बहुतांश सिक्वेन्स भारतात सापडले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
एक्सबीबी.1.16 सब व्हेरिएंटची बहुतेक लक्षणे एक्सबीबी.1.5 सब व्हेरिएंट सारखी असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचे सब व्हेरिएंट देखील आपले रूप बदलत असतात, ही खरी चिंतेची बाब असल्याचे केरखोव्ह यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा :

