Twitter : ‘ऑफिसमध्ये येऊ नका’, ट्विटरचा कर्मचा-यांना मेल, खर्च कमी करण्यासाठी मस्कचा ‘डीप कट्स प्लान’, 50 टक्के कर्मचा-यांच्या नोकरीवर टांगती तलवार

Twitter Blue tick:
Twitter Blue tick:
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Twitter : 'ट्विटरचा खर्च कमी करण्यासाठी एलन मस्क यांनी डीप कट्स प्लानची योजना आखली आहे. त्याअंतर्गत ट्विटर जवळपास 50 टक्के कर्मचा-यांना कमी करणार आहे. अमेरिकेतील मीडिया हाउस ब्लूमबर्ग च्या रिपोर्टनुसार कंपनीत 7500 कर्मचारी आहे. त्यापैकी 4 नोव्हेंबरला 3700 कर्मचा-यांना ट्विटरने बाहेरचा रस्ता दाखवणार आहे, असा दावा ब्लूमबर्गने ट्विटर सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. मात्र, अद्याप ट्विटरकडून याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Twitter : 'अमेरिकी मीडिया हाऊसने म्हटले आहे, आजपासून ट्विटरने कंपनीत कर्मचारी कपात सुरू केली आहे. त्यानुसार अनेक कर्मचा-यांना ऑफिसमध्ये येत असाल तर घरीच राहा, येऊ नका असा मेल पाठविण्यात आल्याचा दावा केला आहे. एलन मस्कने ट्विटवरला अधिग्रहण केल्यानंतर एकाच आठवड्यात मोठ्या प्रमाणात बदल करायला सुरुवात केली. त्याअंतर्गत सर्वप्रथम ट्विटरचा खर्च कमी करणे हा उद्देश आहे. कंपनीला पायाभूत सूविधांवर होणारा खर्च कमी करायचा आहे. हा खर्च कमी करून तब्बल एक अब्ज डॉलर म्हणजेच 82 अब्ज रुपये वाचवायचे आहेत.

Twitter : 'एका अहवालानुसार मस्कने ट्विटर इन्कॉर्पोरेशनच्या नवीन प्रबंधकांना सांगितले आहे की पायाभूत सूविधांवरील खर्च कमी करण्यासाठी पाऊले उचलावी. त्यांच्याम्हणण्यानुसार, ट्विटरचा खर्च वार्षिक 1 अब्ज डॉलर इतका कमी व्हायला हवा. मस्कने या योजनेला डीप कट्स प्लान असे नाव दिले आहे.

या योजनेनुसार ट्विटरच्या आंतरिक संदेशात म्हटले आहे की कंपनीचे लक्ष्य सर्वर आणि क्लाऊड सेवेतून रोजाना 15 लाख डॉलर आणि 30 लाख डॉलरची बचत करणे हा आहे. आंतरिक कागदपत्रांच्या नुसार ट्विटरला सध्या रोज 30 लाख डॉलरचे नुकसान होत आहे. मात्र, अद्यापही या योजनेबाबत अधिकृतपणे ट्विटरने काहीही जाहीर केलेले नाही.

Twitter : 'ट्विटर डाउनचा धोका

ट्विटरच्या सूत्रांनी डीप कट्स प्लानबाबत बोलताना असेही सांगितले आहे की हे ट्विटरसाठी धोकादायक आहे. यामुळे वेबसाईट आणि अॅपवर दबाव येऊ शकतो. तसेच जेव्हा लोक मोठ्या संख्येने याचा वापर करतील तेव्हा ट्विटर डाऊन होऊ शकते. तर एका सूत्राने सांगितले आहे सोशल मीडिया साइट अतिरिक्त सर्वर स्पेसमध्ये कपातसोबत उच्च ट्राफिक सांभाळण्याची क्षमता विकसित करण्यावरही विचार करत आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news